June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कापराचे आरोग्य दायी फायदे

पूजाअर्चेत कॅम्फर (camphor) म्हणजे कापराचा वापर केला जातो. तीव्र गंधयुक्त कापूर केवळ पूजेसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. कापूर एक सेंद्रिय घटक आहे. त्याच्या वैद्यकीय वैशिष्ट्यांमुळे आरोग्यासाठी देखील तो वापरता येऊ शकतो. कापराचं सेवन करू शकत नाही, पण तुम्ही वरच्या वर त्याचा वापर करू शकता.

Advertisement

वारंवार खोकला, कफ जमा होण्यापासून ते चामखीळ आणि कीटक चावल्याने उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्याही दूर करतं. कापूर आवश्यक तेलाच्या रूपात किंवा घन मेणाच्या गोळ्याच्या स्वरूपात मिळतं. कापरामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, एनाल्जेसिक, अँटीसेप्टिक आणि अँटी-कंन्जेटिव्ह गुणधर्म आहेत, ज्यामुळे ते नैसर्गिक औषधांमध्ये एक स्थान बनवतं.

खोकला

छातीत जळजळ आणि खोकला यासारख्या श्वसन रोगांची लक्षणं दूर करण्याची शक्ती कापरात आहे. म्हणूनच घसा आणि छातीवर लागू होणार्‍या विविध उत्पादनांमध्ये हा एक प्रभावी पदार्थ आहे. एक चमचा बदाम तेलामध्ये 4-5 थेंब आवश्यक कापूर तेल मिसळा आणि छातीवर हळूवारपणे मालिश करा. कापूरचे काही थेंब गरम पाण्यात टाकून आपण त्याची वाफ देखील घेऊ शकता.

मुरुम

myupchar.com चे डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, कापराचे दाहक-विरोधी गुणधर्म मुरुम, सूज, लालसरपणा आणि त्वचेचा जळजळपण कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. टी ट्री ऑईल आणि कापूर तेल एकत्र मिसळा आणि कापसाच्या मदतीने बाधित भागावर लावा.

उवा

कापरात अँटिफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे कापूर, नारळाचं तेल एकत्र करून केसांना लावा. यामुळे केसातील उवा कमी होती.

स्नायूंच्या वेदना

कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त वेदनादायक स्नायूंना मालिश करण्यासाठी कापूर तेलाचा वापर केल्यानं त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. तसंच सांध्यातील वेदनाही दूर होतात. यासाठी तिळाच्या तेलात कापूर मिसळून सांध्याची मालिश करा.

खाज

myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. ओमर अफरोज यांनी सांगितलं, त्वचेला सतत खाज सुटत असेल तर त्वचा लाल किंवा उग्र होऊ शकते, त्वचेवर फोड येऊ शकतात. खाज सुटल्यास आणि जळजळ होत असल्यास कापराचं तेल वापरा. यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

Leave a Reply