March 23, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा;ह्या ठिकाणी कोसळणार पाऊस

19 ऑक्टोबर 2020 :- अरबी समुद्रात नव्याने तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र ओमानच्या दिशेने सरकल्याने राज्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास टाकला.

परंतु या काळात गेल्या राज्यातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे विभागातही पावसाने कहर केला.

यातून कुठे सुटका झाल्यासारखे वाटत असतानाच पुन्हा पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशाजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे तेलंगणासह तामिळनाडु, पॉंडेचरी,

अंदमान, आंध्र प्रदेशात पुढील 4 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे़ राज्यात विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात विजेच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बंगालच्या उपसागरात आंध्र प्रदेशजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे.

येत्या २४ तासात ते आणखी विकसित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे विभागातील सोलापूर, सांगली, पुणे आणि सातारा जिल्ह्याला बुधवारी (ता. 14) झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस तालुक्‍यांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरासह, हवेली, बारामती, इंदापूर,

दौंड आणि सासवड तसेच सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, तासगांव आणि पलूस तालुक्‍यांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

Leave a Reply