June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

आगामी चार दिवस कुठे पावसाची शक्यता वाचा..

Maharashtra weather forecast and warning: राज्यातील मराठवाडा (Marathwada), पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), कोकण (Konkan), विदर्भात (Vidarbha) गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rainfall) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Crop damage) आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचं काम सुरु आहे. पण त्यातच आता पुन्हा जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता (Thunderstorm activity expected over parts of Madhya Maharashtra and Marathwada during next 4 to 5 days) 

Advertisement
हवामान खात्याने वर्तवली आहे.

या सोबतच कोकणात मध्यम ते हलक्या स्वरुपात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १९ ते २० ऑक्टोबर या कालावधीत मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील हवामानाचा अंदाज

  1. १७ ऑक्टोबर : कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  2. १८ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  3. १९ ऑक्टोबर : मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  4. २०-२१ ऑक्टोबर : कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

हवामान खात्याने दिलेला इशारा

  1. १७ ऑक्टोबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. उत्तर महाराष्ट्रात किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.
  2. १८ ऑक्टोबर : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.
  3. १९ ऑक्टोबर : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  4. २० ऑक्टोबर : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  5. २१ ऑक्टोबर : मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता.

राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहून लोकांना विश्वासात घेऊन काम करा : मुख्यमंत्री

राज्यात काही दिवसांसाठी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका. नागरिकांनाही गाफील राहू देऊ नका. लोकांना माहिती देत रहा. प्राणाहानी होऊ नये यासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन स्थलांतराचे काम करा, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला अतिवृष्टी व पुरस्थितीत सतर्क राहून काम करण्याचे निर्देश दिले. पुराच्या पाण्यामुळे निर्माण होणारे संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना वेगाने हाती घ्याव्यात असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply