आगळगाव-काटेगाव रस्त्यावर पोलिस व चोरट्यांत झटापट, एका चोरट्याच्या मुसक्या आवळल्या,दोघे फरार,दोन पोलिस कर्मचारी जखमी
महाराष्ट्र स्पीड न्युज
रात्र गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर चोरट्यांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाल्याचा प्रकार बार्शी-भूम मार्गावर आगळगाव- काटेगाव शिवारात घडला. दरम्यान जिवावर उदार होऊन एका चोरट्यास पकडण्यात पोलिसांना यश आले असून दोन चोरटे मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरले.
चोरट्यांकडून तब्बल एक लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर बार्शी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत
शिवा गंगाराम भोसले वय 30 रा. परांडा रोड, कुर्डूवाडी ता. माढा असे या प्रकरणी घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. भोसले यास आज बार्शी न्यायालयात उभे केले असता त्याला सहा दिवसांची दि. 13 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
#जखमी हवालदार योगेश मंडलिक यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे पथक हे गुरूवारी पहाटे रात्र गस्त घालत असताना आगळगाव ते काटेगाव दरम्यान चुंब गावाकडुण एक भरधाव वेगाने येणारी दुचाकी दिसली. त्यामुळे पोलीस पथकाने दुचाकीस्वार आस हात करून गाडी थांबण्याचा इशारा केला दरम्यान दुचाकीवरील चोरट्यांनी पोलिसांच्या इशाऱ्याकडे कानाडोळा करत भरधाव वेगाने पुढे निघून गेली पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली असता चोरट्यांनी आपली दुचाकी रस्त्यावर टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला दरम्यान तीन चोरट्यांपैकी एका चोरट्यास हेच लागल्यामुळे व तू खाली पडल्यामुळे पळून जाण्यात यशस्वी ठरला नाही आणि दोघे मात्र पळून गेले पळून गेलेल्या दोघांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून त्यांना जखमी केले घटनास्थळावरून एका चोरट्याला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे दरम्यान पोलीस व चोरटे यांच्यात झालेल्या झटापटीत पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला त्यामध्ये योगेश मंडलिक व बळीराम बेद्रे हे जखमी झाले आहेत.
पोलीस वाहन चालक माधव धुमाळ,अक्षय टोणपे, गृहरक्षक दलाचे जवान शाहीर, काशीद यांनी पकडले. भोसले यांची तपासणी केल्यानंतर त्याच्या जवळ इरकलच्या साड्या, धोतर,मणी मंगळसूत्र ,शाल,दोन धारदार सुरे, कात्री ,एक पोपट पाना,सोन्याची चेन, ब्लेड, बॅटरी, कानातील रिंगा, यासह एक दुचाकी मोटार सायकल असा सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज मिळून आला.
हवालदार मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सपोनि शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.