बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे भरधाव कारच्या धडकेत महिला जखमी
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
भरधाव वेगातील कारने दुचाकीला पाठीमागुन जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिला जखमी झाल्याचा प्रकार म्हसवड-लातुर राष्ट्रीय महामार्गावर कुसळंब ता.बार्शी येथे घडला.
#सौ आमिना मोगल असे कारने पाठीमागुन जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
Woman injured in car crash at Kusalamba in Barshi taluka
#अब्दुलरहीम महिबुब मोगल वय 47वर्षे रा. धर्माधिकारी प्लाँट गाडेगाव रोड बार्शी या माजी सैनिकाने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की त्यांचे मुळ गाव घारीपुरी ता बार्शी येथे असुन आधुन मधुन गावी जात येत असतो.
ते व पत्नी सौ. आमिना असे दोघे मिळुन चुलत सासु हि आजारी असल्याने तीला पाहण्यासाठी स्कुटी घेवुन सायंकाळी पाच वाजता घारीपुरी येथे गेले होते. चुलत सासुला भेटुन परत बार्शीकडे दोघे सायंकाळी 06.15 वाजता निघाले होते.
दोघे कुसळंब गावातुन जात असताना उतारा जवळ असलेल्या स्पीडब्रेकरच्या डाव्या बाजुने सावकाश जात असताना पाठीमागुन एक वेगाने ईनेव्हा गाडी आली व त्या गाडीच्या चालकाने स्कुटीला पाठी मागुन जोराने धडक दिली त्यावेळी गाडी थोडी पुढे जावुन दगडाला धडकली तेव्हा पत्नी आमिना हि गाडीवरुन खाली पडली . पत्नीस मार लागलेला होता नंतर पत्नीला जखमी आवस्थेत गाडीवर बसवुन ईनेव्हा गाडीचा बार्शी शहरातील पोस्ट आँफिस चौका पर्यंत पाठलाग केला.
पुढे वाहण असल्यामुळे ईनेव्हा गाडी सावकाश पुढे जात असताना त्या गाडीचा नंबर पाहीला असता त्याचा नंबर MH 14 CC 4206 असा होता. तसेच गाडीचा रंग गोल्डन होता. ड्रायव्हर ने गाडी न थांबविता तो तसाच वेगाने पुढे निघुन गेला. पत्नी आमिना असे दोघे मिळुन स्कुटीवर बसुन बार्शीकडे येत असताना ईनेव्हा गाडी क्र MH 14 CC 4206 चा ड्रायव्हर नाव पत्ता माहित नाही . याने त्याचे ताब्यातील ईनेव्हा गाडी हयगईने व अविचाराने , वेगाने चालवुन पाठी मागुन स्कुटीला धडक देवुन स्कुटीवर बसलेली पत्नी सौ आमिना हिस जखमी होणेस कारणीभुत झालेला आहे असे फिर्यादीत म्हटले आहे.अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.