May 23, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कालिदास मंडळाने जपले सामाजिक भान 450 किलो धान्याची केली मदत

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

कवी कालिदास मंडळ गेली 28 वर्ष साहित्य क्षेत्रात उपक्रमशील संस्था म्हणून परिचित आहे .या मंडळाने आजपर्यंत अनेक साहित्यिकांना मेघदूत पुरस्काराने सन्मानित केले आहे.सातत्याने साहित्यिक उपक्रम राबविणाऱ्या या साहित्य संस्थेने आज कोविड 19 च्या विदारक परिस्थितीत सामाजिक भान जपण्याचे कार्य केले आहे

Advertisement

Kalidas Mandal donated 450 kg of grain to Japale Samajik Bhan
बार्शी मध्ये अन्नदान करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मातृभूमी प्रतिष्ठान,राजमाता इंदूताई आंधळकर अन्नछत्रालय व कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय सामाजिक संस्था या तीन संस्थांना एकूण 450 किलो धान्य ग्रामदैवत भगवंत जयंतीच्या निमित्ताने कवी कालिदास मंडळाच्या वतीने देण्यात आले यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी साहित्यिक हा समाजाच्या मनाला उभारी देण्याचं काम करीत असतो आणि बुद्धी सोबतच पोटाची भूक भागविण्याचा मंडळाचा आजचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले यावेळी ज्येष्ठ कवी मुकुंदराज कुलकर्णी यांनीही मनोगतामध्ये सामाजिक संस्थांच्या कार्यामुळे समाजात सुखाची पेरणी होत असल्याचे मत व्यक्त केले मातृभूमी चे अध्यक्ष संतोष ठोंबरे, अशोक हेड्डा, मुरलीधर चव्हाण,प्रा किरण गाढवे,अशोक इनामदार,प्रा सुरेश राऊत,बापू तेलंग यांच्यासह कवी कालिदास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र इकारे,सचिव चन्नबसवेश्वर ढवण, प्रकाश गव्हाणे,मुकुंदराज कुलकर्णी,शब्बीर मुलाणी,डॉ रविराज फुरडे, संतोष पाठक, हर्षद लोहार आदी उपस्थित होते या उपक्रमासाठी कालिदास मंडळाचे उपाध्यक्ष जयसिंग राजपूत ,कार्याध्यक्ष प्रा अशोक वाघमारे,कोषाध्यक्ष गंगाधर आहिरे,सहसचिव आबासाहेब घावटे,सदस्य डॉ कृष्णा मस्तुद, दत्ता गोसावी ,सौ सुमन चंद्रशेखर, शिवानंद चंद्रशेखर आदींनीही योगदान दिले.

Maharashtra Speed News#Barshi# SPEED news#barshi update#barshi news#barshi live update#barshi corona#solapur  news#sopalur#solapur corona update#solapur update#Live news#Live update#latest update      
 

Leave a Reply