May 23, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील धसपिंपळगावात एका वस्तीजवळ सापडले मृत अर्भक,अज्ञातावर गुन्हा दाखल. बार्शी तालुक्यात खळबळ

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील धसपिंपळगाव येथील एका वस्तीजवळ मानवी कृरतेच्या अजब नमुन्याचे दर्शन झाले आहे.
अनैतिक संबंधामधुन राहिलेले तिन ते चार महिने वयाचे (जन्मापुर्वी) पुरूष जातीचे मृत स्थितीमधील अर्भक बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव येथील एका वस्तीजवळील पोलजवळ आढळुन आले असल्यामुळे बार्शी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

A dead infant was found near a settlement in Dhaspimpalgaon in Barshi taluka. Excitement in Barshi taluka
  
बापु  वायकर वय 43 वर्षे,रा-भोळेवस्ती पिंपळगाव धस ता ता-बार्शी यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुध्द फिर्याद दिलेली आहे.
  त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेले आहे की ते  पनवेल येथे ब्रोकरचा व्यवसाय करतात. सध्या लाॅकडावुन चालु असल्याने ते एक महिन्यापुर्वी
कुटुंबासह गावी आलेले आहेत. गावी शेती असल्याने शेताला सिंमेटचे पोल बसवुन तारेचे कंपाउंड
मारण्याचे काम चालु असुन शेती वस्तीच्या पाठीमागे आहे.
   
आज दि.23/05/2021 रोजी सकाळी 08.00 वा चे सुमारास ते झोपेतुन उठुन अंघोळीसाठी गेले होते.
तेव्हा त्यांची मुले शेतात बसवलेल्या सिंमेटच्या पोलला पाणी मारण्यासाठी गेलेली होते.दरम्यान पाणी मारण्यास गेलेली
दोन्ही मुले थोड्यावेळातच परत घरी आली व त्यांनी फिर्यादीस सांगितले की,आपल्या शेतातील एका पोलजवळ एक लहान बाळ मयत अवस्थेत पडलेले आहे. त्यानंतर
त्यांनी शेतात येवुन पाहिले असता शेताच्या पोलजवळ एक लहान अर्भक सुमारे तीन ते चार महिन्याचे जन्मल्या अगोदरचे पुरुष जातीचे
अर्भक मयत अवस्थेत पडलेले होते. त्याच्या डोक्याला खरचटलेले होते व मुंग्याही लागलेल्या होत्या.त्यानंतर खात्री झाली की आज
रोजी सकाळी 08.00 वा चे पुर्वी कोणीतरी अज्ञात इसमाने सदरचे अर्भक जन्मापुर्वीचे अनैतिक संबंधातुन
राहीलेले अर्भक त्याची गुप्त रितीने विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने अर्भक मयत अवस्थेत  शेतात टाकुन
देवुन विल्हेवाट लावली आहे.
  घटनास्थळी सपोनी शिवाजी जायपत्रे, हवालदार गोरख भोसले,प्रविण जाधव,रफिक शेख  यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.अज्ञातावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सपोनी शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

Leave a Reply