बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील शेंद्री येथील गाव तळ्याचा भराव खचून अनेक महिन्यांचा कालावधी उलटून जाऊन व याबाबत जिल्हा जलसंधारण अधिकारी सोलापूर यांना वारंवार लेखी निवेदने देऊनही या तलावाच्या दुरुस्तीकडे संबंधित वरिष्ठ प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे गाव तलावा शेजारील रहिवासी वस्ती मधील लोकांचे जीव धोक्यात आले आहेत. तरी याबाबत प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात येत आहे .
Village lake at Shendri in Barshi taluka poses a threat to the people in the settlement
याबाबत अधिक माहिती अशी की शेंद्री येथील गाव तलावाचा भराव ऑक्टोंबर 2020 मध्ये झालेल्या अतिवृष्टी मध्ये खचलेला आहे. याबाबत शेंद्री ग्रामपंचायती सह तालुक्याचे लोकप्रतिनिधी आ. राजेंद्र राऊत यांनीही मार्च 2021 मध्ये तलावाची तातडीने दुरुस्ती करावी असे लेखी पत्र संबंधित विभागाला दिले होते. मात्र दोन्ही पत्रांकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष करून याबाबत उचित कार्यवाही करण्याचे टाळले असल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे. पावसाळ्याच्या अंतिम टप्प्यात बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेंद्री येथील खचलेला गाव तलाव धोक्याच्या वाटेवर आहे. तो तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून त्या तलावातील पान्याने भरावाला धोका निर्माण झाल्यास गावामध्ये पाणी घुसून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाव तलावाच्या लगतच असलेल्या वस्तीमध्ये पाणी घुसून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.
याबाबत वारंवार लेखी तोंडी निवेदने देऊनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. संबंधित विभाग एखाद्या दुर्घटनेची तर वाट पाहत नाही ना असा प्रश्न या गावातील व गाव तलाव परिसरात राहणाऱ्या संतप्त नागरिकांमधून विचारला जात आहे. अतिवृष्टी होऊन गाव तलाव खचण्याच्या घटनेला तब्बल अकरा महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. तरीही संबंधित विभागाला अथवा त्यांच्या अधिकार्यांना या तलावाच्या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही. हा विभाग कधी जागा होणार असा प्रश्न शेंद्री येथील रहीवाशांमधून विचारला जात आहे.
प्रतिक्रिया;
#मच्छिंद्र सोनवणे( उपविभागीय अधिकारी ल.पा.विभाग,बार्शी) ;
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर निधी उपलब्ध नसल्यामुळे दुरुस्तीचे काम प्रतिक्षेत आहे.निधी उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने हे काम हाती घेतले जाईल
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालु्यातील अलीपुर येथील श्री नवकार जैन सेवा तिर्थ गोशाळा येथे…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातीलपिंपळवाडी येथे गावातील लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात…
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यानी शिक्षकाचे घर फोडुण सोन्या चांदिचे दागिणे…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज मानवाधिकार परिषदेच्या वतीने "कोरोणा योद्ध्यांचा सन्मान"कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोमानी हॉस्पिटल…
टेंभुर्णी;महाराष्ट्र स्पीड न्युज हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचालित टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेचा विद्यार्थी विशाल…
बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर पुरस्कार, लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार प्रदान…