September 9, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर, लायन्स फार्मासिस्ट पुरस्काराचे वितरण

बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज
लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर पुरस्कार, लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Advertisement

Distribution of Shikshak Ratna, Lions Engineer, Lions Pharmacist Award on behalf of Lions Club
तसेच रीझन चेअरमन याची अधिकृत भेट असा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड विकास जाधव हे होते यावेळी व्यासपीठावर झोन चेअरमन नंदकुमार कल्याणी, सचिव संतोष जोशी, खजिनदार अल्ताफ शेख हे उपस्थित होते

यावेळी लायन्स शिक्षकरत्न पुरस्काराने प्रफुल्ल  गाढवे,रामचंद्र  ईकारे,प्रशांत  कोल्हे,नागनाथ  जाधव, प्रतापसिंह  मोहिते, वैजिनाथ  मोरे,प्रणिता  जोशी यांना गौरविण्यात आले.तर लायन्स इंजिनिअर पुरस्काराने
गिरीश  देशपांडे,शकील शेख यांचा सन्मान झाला. तसेच
लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार ओंकार  शहाणे,सुनिल  ललवाणी यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड विकास जाधव यांनी सांगितले की लायन्स क्लबचे माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना, गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊ केला तसेच ज्या ठिकाणी सेवा पोहोचत नाही अशा ठिकाणी लायन्स क्लबचे काम पोहचले आहे येथून पुढे पर्यावरण पुरक काम उभा राहिल असे सांगितले
यावेळी बापूसाहेब कदम ,अक्षय बंडेवार, प्रशांत पंडित, गिरीश शेटे ,महेंद्र कथले ,संदीप नागणे ,ओंकार शहाणे, सुभाष भोसले ,बालकिसन जाजू, राहूल साखरे,  अरुण येळे, लायन्स क्लब बार्शी चेतना चे पदाधिकारी ईश्र्वरी जोशी गायत्री बंडेवार जयश्री कदम यांच्या सह प्रमुख पदाधिकारी सभासद उपस्थित होते

Leave a Reply