June 13, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील मांडेगाव शिवारात अज्ञाताने साडेतीन एकर मिरची जाळली

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
कोरोना महामारीच्या काळामध्ये सततच्या लॉकडाऊन मुळे सर्व व्यावसायिकांना बरोबर शेतकऱ्यावरही खूप मोठे संकट कोसळलेले असतानाच मांडेगाव ता.बार्शी येथे पाण्यात तणनाशक टाकल्यामुळे साडेतीन एकर मिर्ची करपल्यामुळे शेतक-याचे तिन लाखाचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Advertisement

An unidentified person burnt three and a half acres of chillies in Mandegaon Shivara of Barshi taluka

  #महादेव मिरगणे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने तयार केलेला ढोबळी मिरचीचा प्लॉट रुबाबात डौलत असतानाच,  अज्ञाताने केलेल्या गैर कृत्यामुळे  प्लॉट जळून खाक झाला. मिरगणे हे रात्रीच्या सुमारास फवारणीसाठी आपल्या शेतातील प्लास्टिक बॅलरमध्ये पाणी भरून ठेवून गावाकडे निघून गेले. सकाळी लवकरच शेतामध्ये जाऊन साडेतीन एकर मिरची ची फवारणी करून घेतली. आणि दुपारनंतर पाहतो तर काय एक एक मिरचीचे झाड हळूहळू सुकून त्याचे पाने गळायला सुरुवात झाली.  हा प्रकार कशामुळे होऊ लागला हे त्यांच्या लक्षात न आल्याने त्यांनी खत व औषध दुकानदारांना फोन करून लागलीच बोलावून घेतले.  कृषी क्षेत्रातील काही तज्ञ मंडळी त्या ठिकाणी जमा झाल्यानंतर सर्वांच्या परीक्षण आणि निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली कि, फवारणी करण्यासाठी भरून ठेवलेल्या पाण्याचा बॅलरमध्ये कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तननाशक औषध मिसळण्याचे लक्षात आले. कर्ज काढून आणि उदारीवर खाते आणि औषधे आणून, जवळपास 3 लाखाच्या आसपास खर्च केलेला, भर उन्हाळ्यामध्ये आपल्या लहान लेकरांसारख सांभाळणी केलेला, त्या प्लॉटमधील मिरची तोडणीसाठी तयार होत असतानाच, तो मिरचीचा प्लॉट डोळ्यासमोर जळत असताना शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू देखील अनावर झाले. सर्व बाजूंनी संकटात असलेल्या बळीराजाला आणखीन किती संकटाला तोंड द्यावे लागणार ? अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कोणी न्याय देणार का ? कष्टाने उभा केलेल्या पिकाचे नुकसान मिळणार का ? शेतकरी कर्जमुक्त होणार का ? अश्या प्रकारच्या चर्चा करत हळहळ व्यक्त करणारे शेतकरी तालुक्यामध्ये चिंतेत दिसत आहेत. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या, असे अघोरी कृत्य करणाऱ्या आणि बळीराजाला जाणून-बुजून संकटात आणणाऱ्या समाजकंटकाला त्याचा शोध घेऊन त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही करून कडक शिक्षा करावी अशी मागणी शेतकऱ्याचे वतीने करण्यात आलेली आहे. याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात  गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

More Stories

Leave a Reply

You may have missed