मास्क वापरताना ह्या चुका करू नका..नाहीतर?
नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
भारत देशात कोरोना व्हायरसने सध्या थैमान घातलेले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोक संक्रमित होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याने सरकारकडून अणेक उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच नागरिकांना मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे या त्रिसुत्री नियमांचे पालन करण्याबाबत आवाहन केले जात आहे. मात्र नागरिकांकडून याचे पालन होताना दिसत नाही.कांही लोक मास्कचा वापर करतात परंतु तो योग्य प्रकारे करत नसल्याने कोरोना संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे.
कोरोना विरोधात लढण्यासाठी महत्वाचे शस्त्र कोणते असेल तर ते आहे मास्क. पण 50 टक्के लोक याच शस्त्राचा योग्यपद्धतीने वापर करता दिसुन येत नाहीत.
एका अहवालानुसार 64 टक्के लोक चेहरा झाकतात पण त्यांच्या नाकावर मास्कच नसतो. 20 टक्के लोकांचा मास्क हा हनुवटीवर घेतलेला असतो. तर 2 टक्के लोक तर चक्क मास्क मानेवरच लावतात. केवळ 14 टक्के लोक असे आहेत की ते नाक, तोंड आणि हनुवटी झाकली जाईल अशा योग्यप्रकारे मास्क लावतात. जर तुम्ही मास्क लावताना अशी चूक करत असाल तर लगेच सुधारा. योग्य पद्धतीने चेहऱ्यावर मास्क लावा.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क हाच उत्तम पर्याय
नाक व तोंडावाटेच कोरोना महामारीचा विषाणू शरीरात प्रवेश करत असतो. त्यामुळे मास्कचा वापर केल्यास संसर्गापासून दूर राहता येणे सहज शक्य आहे. त्यासाठी मास्क सर्जिकल अथवा N-95 असल्यास अधिक चांगले व फायदेशीर ठरू शकेल. कोरोनाच नव्हे तर दमा, धुळीची अॅलर्जी यापासूनही मास्कमुळे बचाव होतो. हवेतून होणारा संसर्गही सहज टाळता येतो.
Don’t make these mistakes while using the mask..otherwise?