May 21, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

वरण-भाताचे फायदे…वाचा सविस्तर..

भारतात जवळपास प्रत्येक घरात डाळ-भात हा तयार केला जातो. काही लोक डाळ-भात खूप आवडीने खातात तर काही लोक हे डाळ-भाता मुळे वजन वाढत असे कारण देऊन खाण्याचे टाळतात. पण आपण जे इतर पदार्थ खातो त्याचप्रमाणे डाळ-भात खाण्याचेही अनेक फायदे आहेत ते आपन आज पाहणार आहोत.

Advertisement

डाळीतुन मोठ्या प्रमाणातुन प्रोटीन, फायबर आणि कोलेस्ट्रोल मिळते आणि भातामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असते.

1) पचायला खुपच सोपे – डाळ-भातामुळे आपल्या पचनक्रियेला आराम मिळतो. मसूर डाळ किंवा मूग डाळ ही पचवण्यास एकदम हलकी फुलकी असते. आणि तसेच भातही पचनासाठी हलका असतो.

भातात मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असते. आणि याने खरंतर शरीराला एकाप्रकारे ताकदच मिळते.

2) डाळ-भात म्हणजे प्रोटीनचा खजिनाच आहे . जे लोक मांस खात नाहीत, त्यांच्यासाठी डाळ हा म्हणजे प्रोटीनचा मोठा खजिना आहे. डाळ व भातामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रोटीन्स असतात. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने आपल्याला प्रोटीन जास्त मिळतात.

3) फायबरचे प्रमाण- डाळ आणि भातात मोठ्या प्रमाणात फायबर असतं. यामुळे पचनतंत्र निंयत्रित आणि सुरळीत राहतं. फायबरमुळे डायबेटिझसारख्या रोगांपासून सुटका मिळू शकते आणि तुमचं ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहतं.

4) वजन नियंत्रीत करता येतं – अनेक डाएट एक्सपर्ट असे मानतात की, तुम्ही जर वजन कमी करण्याचे प्रयत्न करत असाल तर तुम्ही दिवसातून दोनदा भात खायला हवा. सोबतच भाज्याही खाव्यात.

Benefits of Varan-Bhata … Read more ..

Leave a Reply