May 21, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील खांडवीची जिजाऊ गुरुकुल जपणार सामाजिक बांधिलकी, कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या मुलांना देणार निवासी मोफत शिक्षण

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील खांडवीच्या जिजाऊ गुरुकुल ने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू केला असून कोरोनामुळे मरण पावलेल्यांच्या मुलांना निवासी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही माहिती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे यांनी दिली.

Advertisement


   अनेक दिवस झाले देशात आणि जगात कोरोनाने थैमान घातले आहे. या काळात ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी मोठं मोठया हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेतले पण एकीकडे कोरोनामुळे कित्येक दिवस झाले काम नाही म्हणून उपासमारीची वेळ आली आणि अशा परिस्थितीत त्या महाराष्ट्रातील कित्येक गरीब लोक केवळ वेळेत उचपार न मिळाल्याने आणि पैशाच्या  अभावी मरण पावले. पण त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले घरातील कर्ता माणूसच जर गेला तर त्या कुटुंबाकडे कोण पाहणार त्यांच्या मुलांचे भविष्य आणि शिक्षणाचे काय…. म्हणून महाराष्ट्रातील कोरोना मूळे मरण पावलेल्या घरातील मुलांची निवासी शिक्षणाची जबाबदारी जिजाऊ गुरुकुल खांडवी  ता बार्शी या संस्थेने घेतली आहे
  यामध्ये इ 8 वी ते 12 (कॉमर्स /सायन्स) मधील विद्यार्थ्यांना (हॉस्टेल मेस कॉलेज व शाळा) हे सर्व मोफत मध्ये मिळणार आहे तसेच जी मुले पोलीस व आर्मी भरती करत असतील पण आई व वडील नाहीत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांचा भरती होइपर्यंत चा संपूर्ण खर्च मोफत केला जाणार आहे .जिजाऊ गुरुकुल खांडवी ही संस्था गेली 11 वर्ष झाली शिक्षण क्षेत्रात काम करत आहे .या संस्थेमध्ये मुलाना निवासी सैनिकी पटर्न पध्दतीने पूर्ण शिक्षण दिले जाते मुलांच्या निवास,भोजन, कॉलेज व शाळा आणि प्रशस्त क्रीडांगण हे उपलब्ध आहे .
आपण ही समाजासाठी काही तरी देणं लागतो हा प्रामाणिक उद्देश  ठेऊन  समाजातील आशा मुलाना शिक्षण देऊन त्यांना समाजात सन्मानाने जगता यावे म्हणुन हा उपक्रम सुरू केला .आपल्या आजूबाजूला गावात कुठेही आईवडील नसतील किंवा  अत्यंत परिस्थिती हालाकीची आहे असे मुलं असतील तर आपण जिजाऊ गुरुकुल खांडवी ता बार्शी जि सोलापूर या ठिकाणी संपर्क करावा असे नम्र आवाहन संस्थेचे अद्यक्ष संभाजी घाडगे यांनी केले आहे.

Jijau Gurukul of Khandvi in Barshi taluka will take care of social commitment, provide free residential education to the children of those who died due to corona

Leave a Reply