May 21, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

क्रुरतेने वाहतूक केलेली जनावरे आणि वाहनाचा ताबा देण्यास बार्शी न्यायालयाकडून नकार

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
           बार्शी येथील मानद पशुकल्याण अधिकारी तथा प्राणिमित्र धन्याकुमार पटवा यांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक 27 मार्च 2021 रोजी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी जामगाव हद्दीत बार्शीतून कुसळंब मार्गे उस्मानाबादचे दिशेने जनावरांसह बेकायदेशीर वाहतूक करीत असताना दोन टेम्पो आणि 22 बैल ताब्यात घेऊन संबंधीतावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 119, महाराष्ट्र पशू संरक्षण कायदा 1976 चे कलम 11, 5(अ), 5(ब), 6, 9, प्राणी परिवहन नियम 1978 चे कलम 47,54,56 आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा 1960 चे कलम 11(1)(a), 11(1)(f), 11(1)(h), 11(1)(i), 11(1)(k) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
      सदर गुन्ह्यातील संशईत आरोपी  शिवाजी  काळे रा. कुसळंब ता. बार्शी यांनी बार्शी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेली 2 आईशर टेम्पो ही वाहने व गोवंश जनावरे  ज्यामध्ये बावीस बैल होते त्यांचा ताबा मिळविण्याकरिता  अर्ज केले होते. त्यामध्ये धन्यकुमार पटवा हे नवकार गोशाळेच्या वतीने हरकतदार म्हणून विधिज्ञा मार्फत हजर राहिले. हे अर्ज बार्शीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस. सबनीस यांनी सरकारी पक्ष, आरोपी पक्ष आणि हरकतदार यांचे म्हणणे ऐकून फेटाळून लावले व सदर गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल दोन टेम्पो आणि 22 जनावरे त्यांचेवरील झालेली क्रूरता, त्यांचे वैद्यकीय अहवाल , तसेच हरकतदारमार्फत दाखल करण्यात आलेले न्यायनिवडे यांचा विचार करून आरोपीचे ताब्यात देण्यास नकार दिला व सदरची वाहने हरकतदार यांचे विंनंतीवरून जप्त करण्यात आलेली जनावरे गोशाळेमध्येच ठेवण्यात आली. सदर आदेशामुळे मुक्या जनावरांना जीवनदान मिळाले असून जनावरांची बेकायदा क्रूरतेने वाहतूक करणार्‍यांना चपराक बसला असून प्राणिमित्रांनी न्यायालयाचे आदेशाचे स्वागत केले आहे. यामध्ये सरकारी पक्षाचेवतीने विधिज्ञ प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले.    

Advertisement

Barshi court refuses to take possession of animals and vehicle
 Refusal by Barshi court to detain cruelly transported animals and vehicles

Leave a Reply