June 3, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील दुकाने उघडण्याबाबत माजी मंत्री सोपल यांची जिल्हाधिका-यांसमवेत चर्चा

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी शहराबरोबरच संपुर्ण बार्शी तालुक्यातील  अत्यावश्यक दुकानासह इतर आवश्यक दुकाने उघडण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी आपली प्रदीर्घ चर्चा झाली असल्याची माहिती माजी मंत्री तथा शिवसेनेचे नेते दिलीप सोपल यांनी दिली. यावेळी चर्चेवेळी निवासी जिल्हाधिकारी भारत वाघमारे ,महाहौसिंग चे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे ,बार्शी नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, जिल्हा बँकेचे माजी संचालक अरुण कापसे आदी उपस्थित होते .

Advertisement

Former Minister Sopal discusses with District Collector about opening shops in Barshi

सोपल यावेळी म्हणाले की,ब-याच दिवसांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सामान्य जनतेबरोबरच सर्वांचेच कंबरडे मोडलेले आहे . प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या अनेकांना याचा आर्थिक व त्या बरोबर मानसिक नुकसानी ला सामोरे जावे लागत आहे या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सोबत आवश्यक दुकाने देखील नियम घालून उघडण्यात यावीत . व्यापारी व त्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अवलंबून अनेकांच्या सहनशीलता संपलेल्या आहेत. सुदैवाने बार्शीचा कोरोना टक्केवारी आलेख खालावत आहे

मिरगणे म्हणाले की , स्थानिक पातळीवर कोरोना काळात प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून पक्षपाती कारवाया होऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी आदेशीत करण्यात यावे. अक्कलकोटे यांनी यावेळी लसीकरण चा वेग वाढवणे अधिक केंद्र सुरू करणे तपासणी किट जास्तीचे देणे आदी मुद्दे उपस्थित केले .यावेळी शासनाने 3 तासात 2 कोटी ऑक्सिजन प्लांट साठी देऊनही नगरपालिका प्लांट उभा करण्यात दिरंगाई करत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यासह शासकीय गोदामातील थकीत हमाली, विविध मुद्द्यावर चर्चा झाली

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी यासर्व गोष्टींचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन देत इतर दुकानाबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याचे धोरण ठरवत असुन तसा निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले

Leave a Reply