June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

सावळीच्या मंदिर परिसरात पडला चक्क पैशाचा पाऊस,पोलिसांनी बाहेर आणले सत्य

अचलपूर,(जि. अमरावती) ः

Advertisement
 पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने सावळी मंदिर परिसरात पुजाऱ्यासह मामा-मामीच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेतील संजय गायकवाड हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याला अमरावती येथून अटक करण्यात आली. याप्रकरणात एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी आठ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

परतवाडा ते अंजनगाव मार्गावरील सावळी मंदिर परिसरातील सभागृहात 25 सप्टेंबर रोजी घडलेल्या घटनेत सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे सक्षम पुरावे नसताना सत्य बाहेर काढणे पोलिसांसमोर एक आव्हान होते.

मात्र काही तासांतच तपासाची चक्रे फिरवित परतवाडा पोलिसांनी सत्य बाहेर आणले. त्यानंतर पीडित युतीच्या तक्रारीवरून परतवाडा पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला.

त्यापैकी सात जणांना यापूर्वीच अटक केली होती, तर तीन जण फरार होते. त्या तिघांपैकी संजय गायकवाड याला शुक्रवारी (ता.16) अमरावतीच्या यशोदानगर येथून पोलिसांनी अटक केली.

सदर घटनेतील आठव्या संशयित आरोपीला अटक करण्यात आले आहे. या घटनेतील दोन संशयित आरोपी अद्यापही फरार असून त्यांच्या शोधार्थ पोलिस टीम रवाना केल्या आहेत, त्यांचा कसून शोध सुरू आहे.
-पोपट अब्दागिरे,
उपविभागीय पोलिस अधिकारी, अचलपूर.

Leave a Reply