June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

मुंबई मधील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग

मुंबई – नागपाडा परिसरातील सिटी सेंटर मॉलमध्ये गुरुवारी रात्री भीषण आग लागली. गेल्या ११ तासाहून जास्त वेळ ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून केले जात आहेत, मात्र अद्याप ही आग आटोक्यात आली नाही. या आगीत अडकलेल्या ५०० पेक्षा जास्त लोकांची सुखरुप सटका करण्यात आली आहे. आग विझवताना अग्निशमन दलाचे २ कर्मचारी जखमी झाले आहेत.

रात्रीच्या ९ च्या सुमारास सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये आग लागली.

मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर मोबाईल शॉपीला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले. काही क्षणातच ही आग संपूर्ण मॉलमध्ये पसरली. भयानक आग पाहता अग्निशमन दलाने ब्रिगेड कॉल घोषित केला. मागील ११ तासांपासून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. २०० हून जास्त दुकानांना या आगीचा फटका बसला आहे, यात सर्वाधिक दुकाने मोबाईलची आहेत. आगीमुळे कोट्यवधीचं नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply