मिर्झनपुर येथे सोयाबीनची चोरी
बार्शी:-
शेतात सोयाबीन करूण ठेवलेल्या सोयाबीन पैकी 25 हजार रुपये किंमतीचे दहा पोती सोयाबीन वकिलाच्या शेतातमधुन चोरट्यांनी रातो रात लंपास केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील मिर्झनपुर शिवारात घडला.
#जिवन युवराज दराडे वय- 44 रा-मिर्झनपुर ता. बार्शी जि-सोलापुर सध्या रा-औरंगाबाद यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की ते पत्नी व मुलांसह औरंगाबाद येथे राहणेस असुन तेथे वकीली व्यवसाय करुन कुटुंबाची उपजिवीका भागवितात.
शेतीतील कामे उरकुन घेणेसाठी औरंगाबाद येथुन गावी मिर्झनपुर येथे आले होते. शेती गट नं.104 मधील सोयाबीनचे पिक काढुन घेवुन त्याची मळणीयंत्राद्वारे मळणी करुन घेतली. सोयाबिनचे 27 पोते झाले. ते मळणी केलेल्या ठिकाणीच झाकुन ठेवुन भावाचे शेती गट नं. 111 मध्ये सोयाबिनची मळणी करण्यासाठी गेलो. व तेथील सोयाबिनची मळणी मळणीयंत्राद्वारे करुन घेतली. तेथे सायंकाळचे 08.00 वाजले. त्यामुळे झालेले सोयाबिन घरी नेण्यास वाहन उपलब्ध नसल्यामळे उद्या सकाळी वाहन आणुन झालेले दोन्हीही शेती गट मधील सोयाबिन घरी नेवु असा विचार करुन तेथे झालेल्या सोयाबिनच्या पोत्यावर झाकुन सर्वजन घरी निघुन आलो.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 07.00 वा. चे सुमारास वडील युवराज दराडे हे शेती गट नं.104 मध्ये जावुन झाकुन ठेवलेले सोयाबिन उघडुन पाहिले तेव्हा त्यांना तेथे सोयाबिनचे एकुन 17 पोतेच दिसुन आले. म्हणुन त्यांनी फोन करुन सांगीतले 27 सोयाबीनचे पोत्यापैकी 17 च सोयाबीनचे पोते दिसत आहेत.तेव्हा ते मोटारसायकलवर आमचे शेतात जावुन पाहीलो असता तेथे असलेल्या एकुण 27 पोत्यापैकी 17 पोतेच दिसुन आले. त्यानंतर मी शेतात व आजुबाजुस पाहीलो असता तेथे सोयाबीनचे पोते मिळुन न आल्याने माझी खात्री झाली की कोणीतरी माझे सोयाबिनचे 10 पोते चोरुन नेले आहेत.
याबाबत वैराग पोलिस ठाण्यात अज्ञान चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलिस करत आहेत.