March 24, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील मांडेगावात वाळु चोरी: चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

मांडेगाव ता.बार्शी येथील चांदणी नदीमध्ये बेकायदेशीर पणे वाळु चोरी करणा-या चौघांविरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्याकडुण सात लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

#मंगेश मारूती मिरगणे वय.23वर्षे , लक्ष्मण मारूती मिरगणे वय.26वर्षे, धनाजी सोमनाथ मिरगणे वय.42वर्षे सर्व रा. मांडेगाव ता.बार्शी व मच्छिद्र अक्रुर जाधव वय.30वर्षे रा. रोहकल ता.पंराडा  अशी वाळु चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

#सचिन  नितनात नेम. बार्शी तालुका पोलीस ठाणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांना पेट्रोलिंग दरम्यान बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मांडेगाव येथील चांदणी नंदीमध्ये बेकायदेशीर पणे वाळु चोरी सुरू आहे.काही लोक वाऴुचा बेकायदेशिर उपसा करित आहेत.पोलिस कर्मचारी सदर ठिकाणी गेले असता सदर ठिकाणी काही लोक वाळुचा उपसा करित असलेले दिसले. सदर ठिकाणी मिरगणे यांच्या शेताजवळील चांदणी नदीमध्ये एक ट्रॅक्टरसह ट्रॉली मिळुन आली.  सदर वाळु बाबत परवाना असल्याचे विचारले असता त्यांनी आमच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. त्यांचे विरूध्द सरकार तर्फे भा.द.वि.कलम 379,34 भारतीय पर्यावरण संरक्षण कायदा 9व 15प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply