October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत घरफोडीची मालिका सुरूच; दिड लाखांचा ऐवज लंपास

सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज

घरातील सर्वजन बाहेरगावी गेल्याची संधी साधुन चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा तोडुन आत प्रवेश करून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा एक लाख 45 हजार रूपये किंमतीचा ऐवज लंपास केल्याचा प्रकार बार्शी शहरातील लातुर रस्त्यावरील लक्ष्मीनगर भागात घडला.

#सुरेश सुनिल डाके वय  23 लक्ष्मीनगर बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की
दिनांक 14/02/2021 रोजी दुपारी 01/00 वाजता घरातील सर्वजन परंडा येथे गेले होते. आज सोमवारी ते परत आले असता घराचा कडी कोयंडा तोडुन घरात प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी घरातील रोख रक्कम एक लाख रुपये व 45 हजार रूपयांचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिणे असा ऐवज लंपास केला असल्याचे दिसुन आले.
याबाबत अज्ञात चोरटयांविरुध्द चोरी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply