June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीतील माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांच्यावरील खोट्या गुन्ह्याचा राज्यभरातून होतोय निषेध..

सोलापूर;महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील माहिती  अधिकार कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांचे विरुद्ध कटकारस्थान करून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, याची वरिष्ठ स्तरावर चौकशी व्हावी अशी मागणी राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते आणि विविध संघटना-संस्था करीत आहेत. या सर्व संघटनांची निवेदने महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री, संबंधित खात्याचे सचिव, पोलीस महासंचालक मुंबई, विशेष पोलीस महानिरीक्षक परीक्षेत्र कोल्हापूर, जिल्हाधिकारी सोलापुर आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण सोलापूर यांना राज्यभरातून निवेदने पाठवण्यात येत आहेत.

काटकर हे गेल्या पंधरा वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आणि माहिती अधिकाराचे काम करीत आहेत. त्यांनी 2005 मध्ये माहिती_अधिकार_कायदा निर्माण झाला या कायद्याच्या माध्यमातून राज्यात नव्हे तर देशात देखील सुरू असलेले काही घोटाळे त्यांनी बाहेर काढून योग्य त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचवले आहेत, यामुळे शासनाचा आर्थिक तोटा होणार होता तो वाचला, त्याचबरोबर काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना देखील त्यांनी त्यांची जागा दाखवली आहे, ज्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या लाचलुचपत विभागाकडून उच्चस्तरीय चौकशी सुरू झालेल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील वाळू, भूखंड माफिया आणि बेकायदेशीर व्यवसाय याबाबतही त्यांनी अनेक वेळा आवाज उठविला आहे. माहिती अधिकारातून माहिती संकलित करून संबंधित वरिष्ठांना तक्रारी केल्या आहेत. भ्रष्टाचार, बेकायदेशीरपणे चालणाऱ्या घटना कमी होऊन बंद झाल्या असुन त्यांना आळा बसला आहे. त्याचबरोबर जलशिवार योजना यामध्ये अतिशय निकृष्ट कामे करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला तोदेखील बाहेर काढण्याचे काम आरटीआय कार्यकर्ते दीनानाथ काटकर यांनी केला आहे.
  काटकर यांच्या कार्यामुळे अडचणीत आलेले भ्रष्टाचारी लोक जाणीवपूर्वक काटकर यांच्याविरुद्ध काही ना काही कटकारस्थान करत असतात. त्याचाच एक भाग म्हणुन गंभीर गुन्हे काटकर यांच्यावरती दाखल होत आहेत.या मालिकेला थांबवण्यासाठी राज्यभरातील सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते विविध संघटना संस्था या एकत्रित आल्या आहेत आणि खूप मोठा लढा महाराष्ट्रभर उभा होतोय, यामध्ये राष्ट्रीय रविदास परिषद विद्यार्थी संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आकाश दळवी हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत, त्याचबरोबर राष्ट्रीय छावा संघटना तालुका अध्यक्ष गणेश मोरे, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर, शेगाव, परभणी, फिल्म निर्माता विजय खवरे, सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, अमोल कोल्हे जिल्हाध्यक्ष छावा मराठा युवा महासंघ जळगाव, नितीन बाबर मनसे नेते इंदापूर जिल्हा पुणे, सामाजिक कार्यकर्ते इसाक झारेकरी, भागवत अष्टनकर नागपूर, रवींद्र कडु, सुधीर पाटील, पंकज पिंगळे, किशोर कांबळे बार्शी, सांगली जिल्हा आडगाव कोष्टी समाज, आरटीआय कार्यकर्ते विलास चावरे अचलपूर जिल्हा अमरावती, आरटीआय कार्यकर्ते विलास शिंदे, देविदास कुंजेटवाड, श्रीकांत रेडकर आणि हटकर कोष्टी समाज बांधव बार्शी यांनी आरटीआय कार्यकर्ते दिनानाथ काटकर यांच्या समर्थनार्थ राज्यभरातून निवेदने शासकीय व्यवस्थेला पोहचवली आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून काटकर यांच्याविरुद्ध जे कटकारस्थान होत आहे या कटकारस्थानाचा मागे असणारे समाजकंटक यांचा शोध घेऊन चौकशी करून, सर्व दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, काटकर यांच्या पोलीस संरक्षणात वाढ करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply