February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

डॉ.चंद्रभानू सोनवणे काॅलेजचे ‘नीट’ परिक्षेत दैदिप्यमान यश

महाराष्ट्र स्पीड न्युज

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय वैद्यकिय प्रवेश पात्रता, नीट (NEET) या परिक्षेत डाॅ.चंद्रभानु सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय, उक्कडगांव येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादीत केले आहे. यामध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे व गुण पुढील प्रमाणे. भगवंत पवार (६४५), अनुष्का सुळ (६३८), विजय ठोंबरे (६२५), चैताली जोशी (६२२), श्वेता अरगडे (६१७), प्रसाद भोरे (६११), अजय भोगील (६१०), हर्षदा उबाळे (६०९), ओंकार धस (६०८), सार्थक बनसोडे (६०७), ओम शहा (५९०), जयश्री दळवी (५९०), ऋषिकेश डक (५८६), आदेश आदलिंगे (५६६), चारुदत्त जोशी (५६१), अनिशा हाके (५५८), चैतन्य गवळी (५५६), सुदर्शन चौरे (५५३), धिरज वाघमोडे (५४७), वैष्णवी पाटील (५४७), यांसह सुमारे ३० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ५०० हुन अधिक गुण प्राप्त केले असून संकल्प सेवा संस्थेच्या ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी एम.बी.बी.एस साठी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आपला प्रवेश निश्चित केला आहे. सोनवणे काॅलेज पॅटर्न अवलंबून सर्व तज्ञ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या यशात विशेष कामगिरी बजावली. सर्व प्राध्यापकांनी संयुक्तपणे घेतलेले अथक परिश्रम, वीकली टेस्ट सिरिज, नाइट स्टडी, क्युरी सेशन याच्या बळावर ग्रामिण भागातील अतिशय गरिब पार्श्वभुमीचे विद्यार्थी देखील सोनवणे कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन आज शासकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवत आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष संजीवकुमार सोनवणे, सचिव अविनाश मोरे, संचालिका डाॅ.सुचेता सोनवणे, प्राचार्य अंकुश पांचाळ, प्रा.पियुष पाटील यांसह सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply