October 2, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

जागतिक टपाल दिनानिमित्त राधेश्याम फाउंडेशनच्या वतीने पोस्ट कर्मचाऱ्यांचा सन्मान

महाराष्ट्र स्पीड न्युज
जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून, राधेश्याम फाउंडेशनच्या वतीने, फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, सोलापूर जिल्हा अध्यक्ष धिरज शेळके यांच्या हस्ते आज बार्शी येथील कर्मवीर नगर पोस्ट कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. 9 ऑक्टोंबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून संपूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. 1954 रोजी टपाल खात्याची स्थापना झालेली असून, आजतागायत अविरतपणे टपाल सेवा देण्याचे कार्य पोस्टाच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये होत आहे. खाजगीकरणाच्या आणि आधुनिकीकरणाच्या काळातसुद्धा पोस्ट खात्याने आपले स्थान आणखी टिकवून ठेवत, पोस्टाच्या माध्यमातून सर्व स्तरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरवीत असल्याचे कर्मवीर नगर पोस्ट कार्यालयाचे सब पोस्टमास्तर श्री. एम बी तोष्णीवाल यांनी सांगितले. याप्रसंगी कर्मवीर नगर पोस्ट कार्यालयाचे सब पोस्टमास्तर एम. बी. तोष्णीवाल, लिपिक पंजाबराव कराड, स्वाती कोंडमगिरे, पोस्टमन नागेश कोळी, लक्ष्मण काळे, राहुल पवार, सुहास देशमुख, प्रवीण चांडगे, राहुल मोरे, उकिरडे, प्रकाश काकडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply