June 9, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने परंडा येथे बोंबाबोंब आंदोलन

परंडा:महाराष्ट्र स्पीड न्युज

छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक  रामभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय वळेकर* यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान, समाज परिवर्तन महासंघ आणि महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटना यांच्यावतीने परंडा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, सार्वजनिक बांधकाम उपविभाग आणि तहसील कार्यालय याठिकाणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये परांडा येथे सर्व शेतकऱ्यांसाठी बारमाही हमीभाव केंद्र सुरू करावे, चालू बाजार भावापेक्षा 2000 रुपये जास्तीचा बाजारभाव शेतमालाला मिळावा, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सर्व पिकांची नुकसानभरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावी, भांडगाव ते बार्शी रस्त्यावरील भांडगाव हद्दीतील पुलाची उंची वाढवून नवीन पूल त्वरित करण्यात यावा, दिव्यांग लोकांसाठीचे अनुदान त्वरित त्यांच्या खात्यात जमा व्हावे आदी प्रमुख मागण्यांचा यामध्ये समावेश होता. प्रत्येक कार्यालयाच्या समोर प्रमुख मागण्यांची घोषणाबाजी करत आंदोलकांनी जोरजोरात बोंबा मारत प्रशासकीय अधिकाऱ्यांना घाम फोडला. यावेळी आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित पूर्ण करून अंमलात आणाव्यात अन्यथा येणाऱ्या काळात छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्यावेळी होणाऱ्या सर्व घटनेस प्रशासन जबाबदार राहील असा खणखणीत इशारा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला. यावेळी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात आला. परंडा येथील छत्रपती शिवाजीराजे चौका मधून या आंदोलनाला सुरुवात झाली.याप्रसंगी छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष शिवश्री धनंजय वळेकर, समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डोके, प्रतिष्ठानचे कायदेशीर सल्लागार अॅड. अनंत राशिनकर, क्रांती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष धीरज शेळके, साधु शिवराम पुरी मठाचे अध्यक्ष हनुमंत कातुरे पाटील, नानासाहेब पवार, छावा संघटनेचे मराठवाडा संपर्कप्रमुख अमरभाई शेख, नानासाहेब देवकर, महेश ठोंगे, अमोल जगताप, अमोल शेळके, तानाजी घोडके त्याचबरोबर परंडा तालुक्यातील शेकडो युवक, शेतकरी आणि दिव्यांक बांधव उपस्थित होते.

Leave a Reply