February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

एमपीएससी परिक्षा पुढे ढकलली;मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई – राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी आणि ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या विशेष बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. तसेचा या परीक्षेची पुढील तारीख चर्चा करून घोषित केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याबाबत मुथ्य महाराष्ट्रात जाहीर झालेल्या एमपीएससीच्या परीक्षेबाबत आज झालेल्या बैठकीत चर्चा केली. गेल्या काही दिवसापासून राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती होती. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अभ्यास करायला अवधी मिळावा, अशी मागणी करण्यात येत होती.

त्यामुळे एमपीएससीची ११ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा काही काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत एमपीएससीला माहिती देण्यात आली आहे. आता एमपीएससीशी बोलून परीक्षेची पुढची तारीख जाहीर केली जाईल. मात्र या तारखेला परीक्षा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Leave a Reply

disawar satta king