आगतराव शेळके अध्यात्मभूषण तर रामचंद्र पवार समाजरत्न पुरस्काराने सन्मानित…
सोलापूर; महाराष्ट्र स्पीड न्युज
अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ पुणे आणि कवी फुलचंद नागटिळक प्रतिष्ठान खैराव यांच्या वतीने बार्शी येथे संपन्न झालेल्या 17 व्या अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनामध्ये शिवनेरी पब्लिक स्कुलचे सचिव आगतराव शेळके यांना अध्यात्मभूषण पुरस्काराने तर छत्रपती संभाजीराजे प्रतिष्ठणचे आधारस्तंभ रामचंद्र पवार यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. समाजामध्ये विविध विषयांवर जनजागृती, शिक्षण, अन्नदान व विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत साहित्य संमेलनाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले. बार्शी येथील कै. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवनमध्ये प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ संपादक राजा माने, संमेलनाचे उदघाटक ह. भ. प. अॅड. जयवंत महाराज बोधले, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक शरद गोरे, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, नगराध्यक्ष अॅड. असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, स्वागताध्यक्षा सौ. शोभाताई घुटे, संमेलनाचे आयोजक कवी फुलचंद नागटिळक, महारुद्र जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धिरज शेळके व वैशाली जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार महारुद्र जाधव यांनी मानले.