October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठीची किमाण गुणांची अट शिथिल

मुंबई : अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी किमान गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

Advertisement

सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण मिळणे व सीईटी देणे आवश्यक होते. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे ठरतील. तर, राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.

या अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.

पात्रता गुण पाच टक्क्यांनी कमी
बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे. बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण, मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४० टक्के असतील, तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.

#Maharashtra SPEED News#Barshi# SPEED news#barshi update#barshi news#barshi live update#barshi corona#solapur news#sopalur#solapur corona update#solapur update#Live news#Live update#latest update,Maharashtra Update

Leave a Reply