February 3, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने केली पत्नीची हत्या, मुंडके घेऊन पोहचला पोलीस ठाण्यात

पत्नीचे दुसऱ्या पुरुषा सोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका तरुणाने त्याच्या पत्नीचे मुंडके छाटले आहे. उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील बबेरु गावात ही घटना घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती तिचे मुंडके घेऊन रस्त्याने चालत पोलीस ठाण्यात पोहचला. ते दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा थरकाप उडाला. या प्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

चिन्नर यादव असे त्या तरुणाचे नाव असून त्याचे तीन वर्षांपूर्वी विमला नावाच्या तरुणी सोबत लग्न झाले होते.

चिन्नरला त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्या वरून त्या दोघांमध्ये दररोज वाद व्हायचे. त्यावरूनच गुरुवारी देखील त्या दोघां मध्ये वाद झाले. त्या नंतर चिन्नर ने धारदार सुऱ्याने पत्नीचा खून केला व नंतर तिचा गळा चिरला. त्या नंतर तिचे छाटलेले मुंडके घेऊन तो पोलीस ठाण्यात पोहचला व त्याने पोलिसां समोर आत्म समर्पण केलं. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Leave a Reply