पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक गणेशाची स्थापना नाही.
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 28 गावांपैकी दोन गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वी ठरली असून उर्वरित 26 गावात सार्वजनिक गणेशाची स्थापना झाली नसल्याची माहिती पांगरी पोलीस ठाण्याचे सपोनि सुधीर तोरडमल यांनी दिली.
There is no public Ganesha in Pangri police station.
सपोनि तोरडमल यांनी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली हद्दीतील 28 गावांमध्ये बैठक घेऊन घरगुती पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन विविध मंडळांना व त्या गावातील भाविकांना केले होते.त्यानुसार पांगरी व मळेगाव येथे एक गाव एक गणपती हा उपक्रम यशस्वी ठरला आहे तर उर्वरित गावांमध्ये सार्वजनिक पद्धतीने श्री ची स्थापना करण्यात आलेली नाही.
पांगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्या त्या गावातील पोलीस पाटील, सरपंच ,ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिक गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून हद्दीतील 26 गावात घरगुती गणेशोत्सवास प्रोत्साहन मिळाले.