September 16, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत घर फोडीची मालिका सुरूच पुन्हा घर फोडुण सोन्या चांदीचे दागिणे लंपास

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी शहरांमध्ये बंद घरे फोडण्याची मालिका सुरूच असून घरातील सर्वजण लक्ष्मी सणासाठी बाहेरगावी गेल्याची संधी साधून शहरातील अलीपूर रस्त्यावरील माउली चौकातील एकाचे घर फोडून  सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा साठ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार आज बुधवारी दि.15 रोजी सकाळी उघडकीस आला. मनोज काशीद रा.बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

Barshit’s house burglary series continues again house gold silver ornaments lampas


फिर्यादी हे भातंबरे येथे पशुधन पर्यवेक्षक या पदावर कार्यरत आहेत 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी ते कुटुंबासह मूळ गावी पिंपरी साकत ता. बार्शी येथे लक्ष्मी सणामुळे गावाकडे गेले होते. त्यानंतर आज सकाळी नऊ वाजता ते पिंपरी येथून परत बार्शी येथील त्यांच्या राहत्या घरी आले असता घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला व कडीकोयंडा तिथेच तुटून खाली पडलेला त्यांना दिसला. त्यांनी घरांमध्ये जाऊन पाहिले असता घराच्या जिन्या खालचा दरवाजा उघडा होता.  त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते व बेडरूममधील लोखंडी कपाटाचे दरवाजा उघडा दिसला
त्यांनी पाहणी केली असता कपाटातील सोन्याच्या अंगठी, सोन्याची साखळी, लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या काड्या, कुडके, चांदीचे पैंजण व रोख रक्कम चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरूण अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शेजारील सुधीर  काशीद यांचे घर फोडुण दोन हजार रूपये लंपास केले.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

A series of house burglaries at Barshi continued and the house was burglarized by gold and silver jewelery lamps

Leave a Reply

disawar satta king