May 19, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी राष्ट्रवादी कडुण तहसीलदार यांना निवेदन

बार्शी ;
सर्वसामान्य नागरिक आणि गरीब शेतकऱ्यांचा आक्रोश बहिऱ्या सरकारला ऐकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बार्शीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करत भाववाढ कमी करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन भूमकर, तालुकाध्यक्ष राजकुमार पौळ, बार्शी शहराध्यक्ष अमोल आंधळकर, सरपंच संगमेश्वर डोळसे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष मौलाना अब्बास कादरी, वैराग अध्यक्ष प्रशांत भालशंकर, महिला तालुकाध्यक्षा सुप्रिया गुंड, महिला जिल्हा उपाध्यक्ष शलाका मरोड, युवक शहर अध्यक्ष असिफ शेख, सरचिटणीस राजशेखर गुंड, उमेश नेवाळे, विध्यार्थी अध्यक्ष सुरज वालवडकर, बंडूपंत सातपुते, आतिष गायकवाड, सागर गायकवाड, अमर पाटील, शिवम थोरात, भरत काकडे, विश्वजित देशमुख, बाबा शेख, रफिक बेग उपस्थित होते.

Statement to Tehsildar on behalf of Barshi NCP

एक वर्षांपासून उद्योगधंदे बंद आहेत, लोकांना रोजगार नाही व मोदी सरकार रोजच पेट्रोल, डिझेल, गॅसच्या च्या किंमती वाढवत आहे.तीन हंगाम शेतीमाल कवडीमोल भावानं विकला जातोय, खतांच्या भरमसाठ वाढलेल्या किंमतीने शेतकरी पुरता हतबल झालेला आहे असे म्हणत आंदोलन करण्यात आले.

Leave a Reply