May 18, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीच्या कु.कृतिका यादव हिने दाखवला मनाचा मोठेपणा.सायकलसाठी साठवलेल्या पैशातून ग्रामीण रुग्णालयास दिल्या अकरा ऑक्सिजन सिलेंडर टाक्या भेट

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शीतील अवघ्या अकरा वर्षीय शाळकरी मुलीने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत अनोखा उपक्रम राबवला आहे.
सायकल घेण्यासाठी साठवलेल्या पैशातून चक्क ग्रामीण रुग्णालयाला अकरा ऑक्सिजन सिलेंडर देऊन बार्शीतील कृतिका गोरख यादव या इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींने अक्षरशः समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम केले आहे.

Advertisement

Barshi’s Kritika Yadav showed generosity of mind. Eleven oxygen cylinder tanks donated to a rural hospital from the money saved for bicycles
   या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व थरांतून कौतुक होत असून बार्शी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ शीतल बोपलकर यांनी तर तिचे विशेष कौतुक करत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
      कु कृतिका ही बार्शीतील सुयश हायस्कुल मध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असून तिने सायकल घेण्यासाठी सुमारे पाच हजार रुपयांची बचत केलेली होती.
   दि १० एप्रिलला तिच्या वाढदिवसाच्या दिवशी सायकल घ्यायची होती मात्र सध्या  वाढत्या कोविड मुळे ऑक्सिजन अभावी रुग्णांची होणारी हेळसांड आणि मृत्यू याबाबत दररोज टीव्हीवर बघून आपण सायकल घेण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णासाठी ऑक्सिजन सिलेंडर भेट देऊ अशी सुपीक कल्पना तिने पालकांसमोर मांडली आणि क्षणाचाही विचार न करता तिच्या पालकांनी आणखीन तीन हजार रुपयांची भर घालून कोणताही गाजावाजा न करता तब्बल अकरा ऑक्सिजन सिलेंडर ग्रामीण रुग्णालयात पोहोच केले आहेत करत असताना साधं फोटोसेशन सुद्धा केले नाही याबाबत विचारले असता सध्या शाळा बंद आहेत तसेच वाढत असलेल्या कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार्शीत सर्व थरांतून प्रयत्न केले जात आहेत तेव्हा आपणही काहीतरी करावं म्हणून मी सायकलसाठी साठवलेल्या पैशातून ऑक्सिजन सिलेंडर दिले आहेत असे सांगितले मात्र याबाबत तिने आणि तिच्या कुटुंबाने कुठेही वाच्यता केलेली नाही हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे
कृतिकाने यापूर्वी अबॅकस स्पर्धेत ही राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले आहे.कृतीकाचे सर्वांकडून अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply