बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
घरात कोणी नसल्याची संधी साधुन चोरट्यानी शिक्षकाचे घर फोडुण सोन्या चांदिचे दागिणे लंपास केल्याचा प्रकार भर दिवसा बार्शी शहरातील उपळाई रस्त्यावरील पवार प्लाॅट मध्ये घडला.बार्शी शहरात चोरीची मालिका सुरूच असल्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
During the day at Barshi, the house bursts into flames
#तानाजी कांदे , वय 55वर्ष, रा. पवार प्लॉट, उपळाई रोड बार्शी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यांच्या मेहुण्याच्या मुलीस कुत्रा चावल्यामुळे ते कुटुंबीयांसह दुपारी 1 वाजता उस्मानाबाद येथे गेले होते.ते संध्याकाळी 8 वाजता घरी आले असता घर उघडे दिसले. घराचा कडी कोयंडा घरात आणुन सोप्यावर आणुन ठेवलेला दिसला.घराचा पाठीमागील दरवाजाही उघडा होता. त्यानंतर त्यांनी बेडरुममध्ये जावुन पाहीले असता बेडरुममधील सामान अस्थाव्यस्थ पडलेले होते. बेडरूम मधील लोखंडी गोदरेज कापाटाचा दरवाजा उघडा दिसला व कपाटातील साडया व इतर साहीत्य अस्थाव्यस्थ पडलेले दिसले. कपाटातील लाॅकर उघडे दिसले.त्यावरुन घराचे मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडुन घरामध्ये कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन चोरी केल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्यांनी 30 हजाराचे मिनी गंठण,15 हजाराचे कानातील सोन्याची कर्णफुले, 4 हजार रूपये किमतीच्या कानातील सोन्याच्या रिंगा, 4 हजाराचे चांदिचे फुलपाञ,अत्तरदानी,दोन कमऴे,एक छल्ला,पायातले पैंजनचे दोन जोड असे एकुण 13भार वजणाचे साहित्य असा 53 हजाराचे दागिणे चोरट्यांनी चोरून नेले.
याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालु्यातील अलीपुर येथील श्री नवकार जैन सेवा तिर्थ गोशाळा येथे…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातीलपिंपळवाडी येथे गावातील लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज मानवाधिकार परिषदेच्या वतीने "कोरोणा योद्ध्यांचा सन्मान"कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सोमानी हॉस्पिटल…
टेंभुर्णी;महाराष्ट्र स्पीड न्युज हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी, संचालित टेंभुर्णी येथील कन्या प्रशालेचा विद्यार्थी विशाल…
बार्शी:महाराष्ट्र स्पीड न्युज लायन्स क्लब च्या वतीने शिक्षक रत्न,लायन्स इंजिनिअर पुरस्कार, लायन्स फार्मासिस्ट पुरस्कार प्रदान…
जलसंजीवनी प्रकल्पाचा उपक्रम : महिला उत्पादक कंपनीच्या कार्यालय व शेतमाल प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन सोलापूर; महाराष्ट्र…