June 2, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीतील उपळे (दु) येथे पकडला वाळुचा ट्रॅक्टर

वैराग; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी तालुक्यातील वैराग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उपळे दुमाला येथे रात्रगस्तीदरम्यान पोलिसांनी बेकायदेशीर पणे चोरून वाळु वाहतुक करणारा वाळुचा ट्रॅक्टर पकडला.दरम्यान ट्रँक्टर चालक व मालक पोलिसांच्या समोरून ट्रॅक्टर सोडुन पळुन जाण्यात यशस्वी झाले.याप्रकरणी दोघांवर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Vairag police in Barshi taluka seized a sand tractor at Uple (du) in Thane boundary

ट्रँक्टर चालक खंडु शंकर खांडेकर रा. उपळे दुमाला व मालक लक्ष्मण निवृत्ती जगताप रा.हळदुगे ता .बार्शी अशी याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

  पो.क. स्वप्निल संदीपान शेरखाने वय – 28 वर्षे धंदा नोकरी नेम. वैराग पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की ते व सपोनि परजने, सोबत खलाटे, लोकरे असे डिव्हीजन नाईटराउंड गस्त व नाईटराउंड दरम्यान पेट्रोलींग करत असताना  पहाटे 04/00 वा. सुमारास ते उपळे दुमाला येथे आले असता उपळे दुमाला गावातुन वाऴुने भरलेला एक ट्रँक्टर उपळे दुमाला बसस्टँन्डकडे एक निळ्या रंगाचा ट्रँक्टर येताना दिसला. त्याचा  लागलीच पाठलाग केला असता सदर ट्रँक्टरचा चालक पोलीसांची गाडी पाहुन सदर ट्रँक्टर उपळे दुमाला बसस्टँन्ड जवळील रोडच्याकडेला ट्रँक्टर जागीच सोडुन पळुन गेला. सदर पळुन गेलेल्या इसमाचा पाठलाग केला असता तो अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला.पऴुन गेलेल्या चालकाबाबत व ट्रँक्टर मालकाबाबत आजुबाजुचे लोकांकडे नाव गाव बाबत चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे  ट्रँक्टर चालक खंडु शंकर खांडेकर रा. उपळे दुमाला ता.बार्शी व मालक लक्ष्मण निवृत्ती जगताप रा.हळदुगे ता .बार्शी असे असल्याचे सांगीतले आम्ही सदर ट्रँक्टरची तपासणी केली असता 01 ब्रास वाळु मिळुन आली 600000/- किंमतीचा एक एक निळ्या रंगाचा  ट्रँक्टर व त्यात 01ब्रास वाळु किं.अं.7000 असा एकुन किंमत 6,07,000/-रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदर ट्रँक्टर चालकाने विना परवाना व राॅयल्टी न भरता उपळे दुमाला येथील भोगावती नदीपात्रातुन अवैद्यरित्या वाळु उपसा करून तसेच पर्यावरणाचा -हास होईल असे कृत्य करून यातील चालक हा कारवाईचे भिती पोटी ट्रँक्टर रोडवर उभा करून पळुन गेला आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 9,15 प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply