May 18, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

कोरोणाशी दोन हात करण्यासाठी सुपरस्टार रजनिकांत ही सरसावले.केली येवढी मदत!

चेन्नई |
  कोरोना महामारीमुळे भारतभर मोठे संकट सुरू आहे. या संकटकाळात अनेक सिनेकलाकर कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी धावून आलेले आहेत. काही कलाकार पंतप्रधान सहाय्यता निधीत मदत करत आहेत तर काही कलाकर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह इतर प्रकारे मदत करत आहेत. यामध्ये आता सुपरस्टार मराठमोळा रजनीकांत याने देखील कोरोना ग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे.

Advertisement

सोमवारी सुपरस्टार रजनीकांतने कोरोना महामारी विरूद्धच्या लढाईत तामिळनाडू मुख्यमंत्री कोविड रिलिफ फंडात 50 लाख रूपये दान केले आहेत. यासाठी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टालिन यांची भेट घेतली व त्यांनी 50 लाखांचा चेक मुख्यमंत्र्यांच्या हातात दिला. रजनीकांत यांचे प्रतिनिधी रियाज अहमद यांनी सदरची माहिती सोशल मीडियावर दिली.

रियाज अहमद यांनी एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला. ‘जर तामिळनाडूमधील लोक सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन कठोरपणे पालन करत असतील तर आपण लवकरच कोरोनाला हरवू शकतो.सुपरस्टार रजनीकांत यांनी मुख्यमंत्री एम के स्टालिन यांची भेट घेतली आणि कोविड रिलिफ फंडमध्ये 50 लाख रूपये दान केले आहेत’, असं रियाज अहमद म्हणाले.

दरम्यान, रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हीने देखील 14 मे रोजी मुख्यमंत्री कोविड रिलिफ फंडमध्ये 1 कोटी रूपये दान केलेले होते. रजनीकांत सध्या त्याच्या नव्या अन्नाथे या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्थ होते. घरी येताच त्यांनी लसीकरणाचा दुसरा डोस देखील घेतलेला आहे.

Superstar Rajinikanth also rushed to shake hands with Korona.

Leave a Reply