September 27, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शीत आज दुपारी रस्ता रोको आंदोलन

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज

Advertisement

आज दि.27 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा मुजफ्फरनगर येथील किसान महापंचायत द्वारा केलेल्या भारत बंद आवाहनास प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगार, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, आयटक ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन च्या वतीने बार्शीतील मुख्य पोस्ट चौक येथे  दुपारी बारा वाजता रस्ता रोको आंदोलन
आयोजित करण्यात आले आहे.

शेतकरी विरोधी तीन कृषी कायदे तात्काळ रद्द करा,  स्वामीनाथन आयोग द्या, 2019 – 20 चा पिक विमा मेळावा, 2019 चा दुष्काळ निधी, पिक कर्ज मिळावे, शेतीस दिवसा वीज पुरवठा व्हावा, कोरोना काळात वीजबिल माफ करा, सात हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला पेन्शन, एकवीस हजार रुपये सर्व कष्टकरी वर्गाला किमान वेतन करा, परदेशी सोयाबीन आयात बंद करा, आधारभूत किमत मिळण्याचा शेतकऱ्यांना अधिकार द्या, कोविड काळातील शैक्षणिक फीस माफ करा, पेट्रोल डीझेल दरवाढ रद्द करा, सार्वजनिक उद्योगांची कवडीमोल विक्री बंद करा या मागण्या करण्यात आले आहेत.

या मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलनात सक्रीय भागीदारी करावी असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून करण्यात आले आहे.

Road Rocco agitation this afternoon at Barshi

Leave a Reply

disawar satta king