October 19, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी येथील शाहू फुले आंबेडकर संस्थाचालक कर्मचारी असोसिएशनच्या विभागीय मेळाव्याने कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
       बार्शी त शाहू फुले आंबेडकर संस्थाचालक कर्मचारी असोसिएशनचा सहा जिल्ह्याचा विभागीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन पांगरीच्या केंद्रीय आश्रम शाळेचे संस्थापक प्रा. संजीव बगाडे, मुकुंद शिंदे व भारत मोरे यांनी केले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष या असोसिएशनचे अॅड. मुंजाजीराव भाले पाटील होते.तर प्रमुख मार्गदर्शक  प्राध्यापक अंबादासजी ढोके होते.

Advertisement

Departmental Meeting of Shahu Phule Ambedkar Institutional Employees Association at Barshi
    या मेळाव्यात केंद्रीय आश्रम शाळा कर्मचारी गत अठरा वर्षांपासून विनावेतन काम करत आहेत. युती शासनाने दि. ८ मार्च २०१९ रोजी या शाळांना तपासणीच्या अधीन राहून 20 टक्के अनुदान जाहीर केलेले होते, यामुळे ह्या शाळांची दोन वेळा तपासणी होऊन देखील अद्याप पर्यंत या शाळांना शासनाचे कसलेही अनुदान मिळालेले नसल्याने संस्थाचालक व कर्मचारी अडचणीत आलेले आहेत त्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्यासाठी या ठिकाणी हा मेळावा आयोजित केला होता.
   प्रा. अंबादास ढोके यांनी अनुदान मिळवण्यासाठी शाहू फुले आंबेडकर संस्थाचालक व कर्मचारी असोशियन च्या वतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.लवकरच या शाळांना100% अनुदान व VJNTची संहिता लागू होईल.तसेच या कर्मचाऱ्यांची येनारी दिपावली गोड होईल असे आश्वासित केले.
कर्मचारी संघटनेचे संदीप सूर्यवंशी यांनी देखील आम्ही दोन्ही संघटना एकत्र होऊन लढत असल्याने लवकरच आपल्याला चांगले यश मिळेल असे कर्मचाऱ्यांना सांगून त्यांचे प्रबोधन केले.
   या मेळाव्यासाठी सोलापूर,उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा,सांगली व पुणे येथून मोठ्या प्रमाणात कर्मचारीवर्ग व संस्थापक मंडळी आले होते.
  यावेळी व्यासपीठावर रावसाहेब राठोड, श्रीकांत मोरे,शिवाजी मावाळे ,रमेश गायकवाड,गोविंद वनवे, मानसिंग पवार, कालिदास वीर, बालाजी मेनकुदळे, पोपट खामकर,, मुकुंद शिंदे ,भारत मोरे आदी उपस्थित होते. प्रस्तावना प्रा. संजीव बगाडे यांनी करून कर्मचाऱ्यांच्या व्यथा मांडल्या तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांगरी च्या कु. रजनी पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले.शिवाजी बगाडे  यांनी आभार मानले.

Leave a Reply

disawar satta king