पुणे;
शिक्षण व्यवस्थेत शारीरिक शिक्षण हा विषयाला संपूर्ण जगभरात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे .
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना महामारीने आपल्याला शारीरिक क्षमता सक्षम असणे किती आवश्यक आहे. याची जाणीव आपणास करून दिली आहे, जणू आपल्याला आरसाच दाखवला आहे की आपले शरीर या आधुनिक जीवनशैलीमुळे किती खंगलेले आहे. जीवनाचा परीपुर्ण आनंद घ्यायचा असेल तर आपले शरीर सुदृढ असणे आत्यंतिक गरजेचे आहे त्यामुळे शारीरिक शिक्षण हा विषयच समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे . शारीरिक सदृढता असेलच तरच देश देखील सुदृढ व बलाढ्य होईल, आणि देश अपंग होण्यापासून वाचू शकतो. सर्व देश सुदृढ होईल तेव्हा जागतिक स्तरावर खास करून ऑलिंपिक स्पर्धेतील आपली क्रीडेतील कामगिरी ही नक्कीच विलक्षणीय असेल, त्याची तयारी मात्र प्राथमिक व माध्यमिक शालेय स्तरापासून व्हायला हवी. असे असताना निदान आता तरी प्रशासनाने डोळे उघडले पाहिजेत. शासनाने महाराष्ट्रातील शारीरिक शिक्षण विषयावरच आघात( प्रहार ) घालण्याचे निर्णय गेल्या दहा ते बारा वर्षात घेतले गेलेले दिसून येतात ,
Physical Education Teachers’ Dam Movement in Pune !!!
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे विविध प्रमुख ज्वंलत प्रश्न प्रलंबित आहेत, शासन दरबारी व लोक प्रतिनिधी यांच्या मार्फत सतत गेली दहा वर्षापासून सातत्याने पाठपुरावा सुरु आहे .तरी देखील प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही . या प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी यासाठी सोमवार दि.१८ आँक्टोंबर २०२१ रोजी सकाळी १०.०० वा. मा.श्री. विशाल सोळंकी साहेब ,आयुक्त शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य , पुणे यांच्या कार्यालय समोर सेंट्रल बिल्डिंग , पुणे येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहोत. बलशाली राष्ट्रनिर्मिती शारीरिक शिक्षण व खेळाची अत्यंत आवश्यकता आहे .शासनाने यासाठी ठोस निर्णय प्रक्रिया करावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आंदोलनाची तीव्रता वाढवत आहोत.
संघटनेच्या प्रमुख मागण्या –
१) संच मान्यतेमधील अन्याय कारक शारीरिक शिक्षण शिक्षक पदा संदर्भातील निकष तात्काळ बदलण्यात यावेत.( संचमान्यता निकष शासन निर्णय – दि.१३/०७/२०२०)
२) शारीरिक शिक्षण शिक्षक पुर्ण वेळ पदासाठी शारीरिक शिक्षण विषयाची पुर्ण कार्यभांराची अट काढून टाकण्यात यावी.
३) मुंबई विद्यापीठ , मुंबई कार्यक्षेत्र मधील अनुदानित , विनाअनुदातील महाविद्यालयातील १८८ जागा भरण्यात यावेत.
४) इतर मागण्या संदर्भात पुणे येथे शारीरिक शिक्षण शिक्षक यांचे धरणे आंदोलन होणार असल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ मा.श्री प्रदीप नवले सोलापूर जिल्हा अध्यक्ष यांनी माहिती दिली आहे . तरी शारीरिक शिक्षण शिक्षक बांधवानी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज आमच्या कामाचे कौतुक करूण पाठीवर कौतुकाची थाप देऊन केलेला हा सन्मान आमच्यासाठी…
बार्शी;श्री शिवाजी महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहत साजरा करण्यात आला.या…
बार्शी;श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी, वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…
बार्शी;महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी "PAN India…
बार्शी-बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि विजयादशमी उत्सव या कार्यक्रमाचे ऑनलाईन स्वरूपात आयोजन करण्यात…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज लायन्स क्लब बार्शी, विधी सेवा समिती बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या…