Advertisement

बार्शीत रविवारी सीताफळ ऊत्पादन व तंत्रज्ञान प्रशीक्षणाचे आयोजन

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

येथील मधुबन फार्म & नर्सरी आणि लायन्स क्लब बार्शी टाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी बार्शी येथे शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी कोणतीही शुल्क आकारले जाणार नाही.

Advertisement

Conducting Custard Production and Technology Training on Sunday in Barshi


बार्शी येथे परंडा बायपास चौकात सीताफळ किंग डॉ. नवनाथ कसपटे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या मधुबन फार्म & नर्सरीच्या परिक्षेत्रात सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत हे ‘भव्य शेतकरी मेळावा’ आणि ‘सीताफळ उत्पादन व तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चासत्र होणार आहे.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील हे या मेळाव्यात अॅनलाईन सहभागी होणार असून, विद्यापीठाचे कृषी विस्तार, प्रक्रिया व निर्यात क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. संजय पांडुरंग पांढरे हे या चर्चासत्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून शेतकर्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी डॉ. नवनाथ कसपटे कीड-रोग व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यात 42 सीताफळ वाणांची प्रक्षेत्रावरील लागवड तसेच सीताफळ पीक उत्पादनाची विविध प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत. तसेच चर्चासत्रात सीताफळ लागवडीसंदर्भात पूर्वमशागत व पूर्व नियोजन, योग्य जातीची निवड, रोपांची योग्य लागवड पद्धत, कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, बहार व्यवस्थापन, सीताफळ विक्री व्यवस्थापन या विषयांवर उपस्थित सीताफळ उत्पादक शेतकर्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
मेळावा व चर्चासत्रासाठी कसलीही फी आकारण्यात आलेली नसून, यावेळी सोशल डिस्टंन्सींग व मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. यासाठी मर्यादीत जागा असल्याने आगावू नोंदणी करणे आवश्यक आहे. आगावू नोंदणीसाठी 9923137757 किंवा 9881426974 या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन रवींद्र कसपटे व प्रविण कसपटे यांनी केले आहे. तर मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष अजित देशमुख व पदाधिकारी यांनी केले आहे.


admin

Recent Posts

अतिवृष्टी मुळे नुकसान;श्रीपतपिंपरी शिवारात तरूण शेतक-याची आत्महत्या

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज अतिवृष्टीमुळे ओढ्याचे पाणी शेतात घुसुन उडदाचे पिक पाण्याच्या प्रवाहात वाहुण जाऊन…

7 hours ago

बार्शीत सौदरे केंद्राची शिक्षण परिषद संपन्न

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज सौंदरे केंद्राची शिक्षणपरिषद बार्शीतील ढगे मळा येथील जिल्हा सोसायटी कार्यालयात कोरोनाचे सर्व…

7 hours ago

बार्शीत आज दुपारी रस्ता रोको आंदोलन

बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज आज दि.27 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा…

8 hours ago

बार्शी तालुक्यातील घारी येथे मोठ्या प्रमाणात लसीकरण

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातील घारी येथे ग्रामपंचायत,आरोग्य विभाग व ग्रामस्थ यांनी संयुक्त पणे…

8 hours ago

शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि.25 सप्टेंबर 2021 रोजी…

3 days ago

चिखर्डे केंद्राची आँनलाईन शिक्षणपरिषद टीम्स अँपद्वारे उत्साहात संपन्न..!

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज चिखर्डे ता.बार्शी  केंद्राची  सप्टेंबरची आँनलाईन शिक्षण परिषद टीम्स अँपद्वारे उत्साहात संपन्न…

3 days ago