बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
ट्रॅक्टर व दोन ट्राॅली घेऊन गावाकडे निघालेल्या ट्रॅक्टर चालकास अडवुन त्याला मारहाण करत त्याचे हातपाय त्याच्याच अंगावरील कपडे काढुण बांधुन दोन ट्राॅली,हेड,मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा पंधरा लाख रूपये किंमतीचा ऐवज पाच दरोडेखोरांनी घेऊन पलायन केल्याचा प्रकार बार्शी-येरमाळा मार्गावरील पाथरी गावानजीक काल दि.12 रोजी रात्री घडला.
15 lakh stolen from Barshi-Yermala road by tractors, trolleys
# चालक संजय राठोड, वय 20 वर्षे, रा. विचकुलदरा तांडा
वडवणी, ता.वडवणी, जि.बीड, याने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादीत म्हटले आहे की काल सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टरच्या हेडला विकत घेतलेल्या दोन ट्रॉल्या
जोडून टेंभुणी-कुडूवाडी-बार्शी मार्गे माझे वडवणी गावी निघाला. भाऊ त्याच्या मोटार सायकलवर पुढे निघून गेला. रात्री 09:30 वा.चे सुमारास तो पाथरी गावच्या पुढे 02 कि.मी. अंतरावर आला असता रस्त्यात खडे असल्याने व रस्ता खराब असल्याने तो ट्रॅक्टर सावकाश चालवत होता.
त्यावेळेस अचानक रस्त्याच्या कडेला बसलेले चार ते पाच अनोळखी इसम वाहन सावकाश
असल्याने ट्रेलर मध्ये चढून जवळ आले ट्रॅक्टर बंद करून फिर्यादीस ट्रॅक्टरच्या खाली ओढले व
एकजण ट्रॅक्टर चालू करून घेऊन पुढे येरमाळ्याचे दिशेने निघून गेला. बाकी लोकांनी फिर्यादीस
रस्त्याच्या कडेला अंधारात घेवुन जाऊन हाताने, लाथाबुक्क्याने तोंडावर अंगावर मारहाण
करून तुझ्याजवळचे पैसे काढ असे सांगून काही अंतरावर ऊसाच्या शेतात घेवुन जाऊन माझी
पँट काढून पॅटने पाय बांधले. शर्ट काढून माझे दोन्ही हात बांधले व बनियनने माझे तोंड बांधून
माझे खिशातील रोख रक्कम 5000/- रु. व एक मोबाईल काढून घेवुन त्याला तेथेच टाकून
काहीवेळाने निघून गेले.
याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज आमच्या कामाचे कौतुक करूण पाठीवर कौतुकाची थाप देऊन केलेला हा सन्मान आमच्यासाठी…
बार्शी;श्री शिवाजी महाविद्यालयात डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहत साजरा करण्यात आला.या…
बार्शी;श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी, वनस्पतीशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने…
बार्शी;महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी "PAN India…
बार्शी-बार्शीतील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन आणि विजयादशमी उत्सव या कार्यक्रमाचे ऑनलाईन स्वरूपात आयोजन करण्यात…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज लायन्स क्लब बार्शी, विधी सेवा समिती बार्शी आणि ग्रामपंचायत दडशिंगे यांच्या…