कोविशिल्डच्या एकाच डोसवर भागणार?लसीकरण प्रकिया होणार गतीमान
नवी दिल्ली;
सद्यस्थितीत दोन डोसद्वारे कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे.
मात्र, लवकरच कोविशिल्ड या लसीचा केवळ एकच डोस भरपुर ठरणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह आरोग्य यंत्रणेलाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतात लसीकरणासाठी मुख्य लसीची भूमिका निभावणाऱ्या कोविशिल्डच्या सिंगल डोसचा नियम आणण्याची तयारी केंद्र शासन करीत आहे . अर्थात याबाबतीत अद्याप निर्णय झालेला नसला तरीही सरकारद्वारे तज्ज्ञांशी याबाबत चर्चा सुरू आहे .
Run on a single dose of Covishield? The vaccination process will be faster
कोरोना लस ट्रॅकर प्लॅटफॉर्मवरून डेटा गोळा केल्यानंतर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याच्या आपल्या निर्णयाची समीक्षा सरकार करणार आहे . हाच डेटा सिंगल डोसच्या बाबतीत निर्णय घ्यायचा की नाही , यावर विचार करण्यासाठी सरकारला खुप महत्वाचा ठरणार आहे .मात्र एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार , ऑगस्टपर्यंत यावर विश्लेषण होण्याची दाट शक्यता आहे .
कोविशिल्ड ही भारतात मुख्य लसीचे काम करीत आहे . आजपर्यंत भारत देशात २०.८९ कोटी लोकांना लस देण्यात आली असून यातील ९० टक्के कोविशिल्डचे आहेत . आता रशियाच्या स्पुटनिक या लसीलाही देशात मंजुरी देण्यात आलेली आहे .
नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन ( एनटीएजीआय ) कोव्हिड वर्किंग ग्रुपचे अध्यक्ष डॉ . एन . के . अरोरा यांनी सांगितलेले आहे की , ‘ एक प्लॅटफॉर्म तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे . याठिकाणी क्लिनिकल डेटा , लसीचा डेटा आणि समग्र आजारांचा डेटा असे तीन सेट स्थापन केले जाणार आहेत . या आधारावर लस किती प्रभावी आहे याची आम्ही तपासणार आहोत . याशिवाय दुसऱ्यांदा संक्रमण आणि त्याच्या परिणामाचा अभ्यास केला जाईल . मार्च-एप्रिलमध्ये लसीकरणाच्या प्रभावाचा अभ्यास आवश्यक असल्याचीही चर्चा आमच्यात झालेली आहे .’
सिंगल डोसचा नियम आल्यास मोठ्या लोकसंख्येचे अतिशय वेगाने लसीकरण होण्यास खुप मदत होईल. सध्या लस उपलब्ध नसल्यामुळे लसीकरणाचा वेगही देशभर चांगलाच मंदावलेला आहे . पण कोविशिल्डच्या सिंगल डोसला मंजुरी मिळाल्यास मोठा प्रश्नच सुटणार आहे .
Maharashtra Speed News#Maharashtra# SPEED news#Maharashtra update#Maharashtra news#Maharashtra live update#Maharashtra corona#solapur news#soplapur#solapur corona update#solapur update#Live news#Live update#latest update#Mumbai#pune#Osmanabad