October 5, 2021

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

लसीकरणच देशाला कोरोना पासुन स्वातंत्र्य देईल – राकेश नवगिरे

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज

बार्शी तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे “राष्ट्रपिता महात्मा गांधी” यांच्या जयंतीनिमित्त मोफत लसीकरण शिबीर घेण्यात आले, सोलापूर रोड बार्शी ख्रिस्ती चर्च कंपाऊंड येथे लसीकरण मोहीम राविण्यात आले, कोरोना या विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातलेला असून लसीकरण हे प्रभावी रित्या कोरोना वर काम करत असून कोरोना प्रादुर्भाव कमी होताना दिसून येत आहे,

Advertisement

Only vaccination will give freedom to the country from corona – Rakesh Navgire

ह्यातच तालुका कोरोना पासुन मुक्त होण्यासाठी बार्शीत लसीकरण खुप जोरात होत आहे, ह्यातच बार्शी ख्रिस्ती चर्च कंपाऊंड येथे आज एकूण 100 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले व नागरिकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती करण्यात आले तसेच नागरिकांचे रिजिस्ट्रेशन करुन त्यांचे व्हेरिफिकेशन करुन पावती देणे ह्यासर्व बाबी सोलापूर रोड वरील सदस्यांनी सांभाळल्या, आरोग्य अधिकारी डॉ ढगे यांनी लस उपलब्ध करून दिली व आरोग्य सेविका लोखंडे एस बी, जाधवर आर ए, आशा वर्कर स्वाती जगदाळे, राणी पावले, शितल लुंगारे, सुलभा देशमुख, संध्या मोरे ह्यांनी नागरिकांना लस दिली व जनजागृती केली लसीकरण मोहिमेचे आयोजन राकेश नवगिरे तालुकाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग यांनी केले होते ते ह्यावेळी म्हनाले लसीकरण हेच आपल्या देशाला कोरोना पासुन स्वातंत्र्य देईल, जसे महात्मा गांधीजी यांनी देशाला स्वातंत्र्य दिले, शिबिरास सुवर्णा शिवपुरे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला, बार्शी ख्रिस्ती चर्च चे अध्यक्ष शांतवन रणदिवे, सतीश पाचकुडवे कार्याध्यक्ष बार्शी तालुका काँग्रेस, काँग्रेस जेष्ठ नेते बाप्पा सुतार, समाजसेवक बालाजी डोईफोडे, नगरसेवक बापू जाधव, शिवसेना उपशहरप्रमुख इलियास शेख, सलीम मुलानी,इरफान बागवान, दीपक सावळे आदींनी भेट दिली, या मोहिमेसाठी विकास नवगिरे, विजय घोंगडे, प्रबळ दाखले, आशिष रणदिवे, पियुष दाखले, सुरेश घोंगडे, उमेश नेवाळे, प्रकाश दाखले, आशिष कांबळे, स्टीफन नवगिरे, संजय अंधारे आदींनी परिश्रम घेतले

Leave a Reply