बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
बार्शी ते येरमाळा दरम्यान महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत सुरू असलेल्या महामार्गाच्या कामादरम्यान पाथरी शिवारात तयार करण्यात आलेल्या सदोष पुलामुळे व सततच्या झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठून तब्बल सहा एकर सोयाबीनचे पिक पाण्यावर तरंगत असून त्यामुळे शेतकऱ्याचे सहा लाख रुपये यापेक्षाही जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला असून झालेल्या नुकसानीची रक्कम तातडीने द्यावेत यावी अन्यथा यापुढे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. बाबासाहेब गायकवाड असे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे.
Due to that faulty bridge at Pathri on Barshi-Yermala road, water in the crop of the farmer
नुकसान ग्रस्त शेतकरी गायकवाड यांनी बार्शी तहसीलदार व कृषी विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की त्यांची पाथरी शिवारात गट नंबर 255 मध्ये जमीन आहे. त्यांनी चालू हंगामात या जमिनीमध्ये सहा एकर सोयाबीनचे पीक केले आहे. त्या पिकाला 85 दिवस पूर्ण झाले असून त्याला शेंगाही लागलेल्या आहेत. सदर शेतकऱ्याच्या शेतीच्या पूर्व बाजूस येरमाळा -बार्शी महामार्गाचे काम झालेले आहे. सदर महामार्गावर गट नंबर 255 चे दक्षिण बाजूस पूर्व-पश्चिम चालीचा पाणी जाण्यासाठी पूल केलेला आहे. त्यांच्या जमिनीतील येणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी महामार्गाचे व त्यांच्या जमिनीचे दरम्यान उत्तर -दक्षिन चालीची चारी काढलेली होती. परंतु सदर पुलाचे काम सदोष असल्यामुळे सदर चारीतुन पावसाचे पाणी उलट सदर शेतकऱ्याच्या शेतात येऊन कमरे इतके पाणी शेतातच साठून राहिलेले आहे. त्यामुळे सोयाबीन पाण्यामध्ये बुडून पिकांचे सहा लाख रूपये पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.
त्यांच्या जमिनीतील पाणी चाळीतून पुलाखालून न जाता पावसाचे पाणी हे त्यांच्या शेतात सोयाबीनचे पिकात येऊन त्यांचे नुकसान झालेले आहे.
गतवर्षीही अशाच पद्धतीने ऊस पिकाचे नुकसान झाले होते.तेव्हा रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. जाधव यांनी संबंधित कंपनीला लेखी पत्र देऊन काम करण्याबाबत सुचना केली होती.मात्र तरीही संबंधित कंपनीने याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान तलाठी पिचके,कृषी सहायक बाळासाहेब जानराव व ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून सात लाखाचे नुकसान झाले असल्याचा अहवाल सादर केला आहे.
प्रतिक्रिया;
बाबासाहेब गायकवाड (नुकसानग्रस्त शेतकरी);
पाणी शेतात घुसत आहे.कपनीकडे वारंवार तक्रारी करूणही लक्ष दिले जात नाही.न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागणार.
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज अतिवृष्टीमुळे ओढ्याचे पाणी शेतात घुसुन उडदाचे पिक पाण्याच्या प्रवाहात वाहुण जाऊन…
बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज सौंदरे केंद्राची शिक्षणपरिषद बार्शीतील ढगे मळा येथील जिल्हा सोसायटी कार्यालयात कोरोनाचे सर्व…
बार्शी ; महाराष्ट्र स्पीड न्युज आज दि.27 सप्टेंबर रोजी दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चा द्वारा…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज बार्शी तालुक्यातील घारी येथे ग्रामपंचायत,आरोग्य विभाग व ग्रामस्थ यांनी संयुक्त पणे…
सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशाप्रमाणे शनिवार दि.25 सप्टेंबर 2021 रोजी…
बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज चिखर्डे ता.बार्शी केंद्राची सप्टेंबरची आँनलाईन शिक्षण परिषद टीम्स अँपद्वारे उत्साहात संपन्न…