December 8, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

हरवलेल्या मुलास एका तासात पोलिसांनी आईवडिलांकडे केले सुपुर्द

बार्शी;महाराष्ट्र स्पीड न्युज
मानसांच्या गर्दीत हरवलेल्या अवघ्या चार वर्षाच्या बालकाची व त्याच्या आई-वडीलांची भेटगाठ घालुन दिल्याचा सुखद प्रकार बार्शीत घडला.महिला पोलीस कर्मचा-यासह दोन पोलीस कर्मचा-यांनी प्रसंगावधान राखून मुलगा एका तासाच्या आत पालकांकडे सुपुर्द केला.

Advertisement


  याबाबत अधिक माहिती अशी की बार्शीतील शिवाजीनगर भागात एक चार वर्षीय बालक रडत असल्याची बाब तेथे खेळत असणा-या मुलांच्या निदर्शनास आले.तेव्हा त्या मुलांनी त्या मुलाकडे चौकशी करूण त्याच्या आईवडीलांचा व घराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यामध्ये त्या मुलांना यश न आल्यामुळे त्या मुलांनी त्या बालकास बार्शी शहर पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

The missing child was handed over to his parents by the police within an hour


  
त्यानंतर शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कर्मचारी सिंधू देशमुख ,सोनिया मुंढे व
पो कॉ घुले या दोन कर्मचा-यांनी त्या अवघ्या चार वर्षीय बालकाला बोलते करण्याचा प्रयत्न केला.
त्या मुलाला स्वतःचे अथवा शाळेचेही नाव सांगता येत नव्हते.तरीही  पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रयत्न न सोडता बालकाला विश्वासात घेवुन माहिती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला.व उपलब्ध माहितीनुसार त्यांनी त्याच्या शाळेचा व आई वडिलांचा एका तासाच्या आत शोध घेतला.आईवडीलांची खात्री करूण त्या बालकास त्यांच्याकडे सुपुर्द केले.
  असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी शाळेत जाणा-या मुलाच्या गळ्यात ओळखपत्र सक्तीने घालावे असे सांगुण दुक्षता घेण्यास सांगितले.

Leave a Reply