December 8, 2022

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

समता पॅनलचे प्रमोद देशमुख मताधिक्याने विजयी

बार्शी; महाराष्ट्र स्पीड न्युज
गुळपोळी ता.बार्शी येथील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  तथा माजी शिक्षक आमदार  दत्तात्रय सावंत समर्थक प्रमोद देशमुख यांनी सेकंडरी स्कूल एम्प्लॉइज क्रेडिट को-ऑपरेडिव्ह मुंबईच्या पंचवार्षिक निवडणुकीत समता पॅनलमधून दणदणीत विजय मिळवला आहे.
देशमुख यांच्या माध्यमातुन सोलापूर जिल्ह्याला संचालक होण्याचा पहिला मान मिळाला.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आनंदोत्सव साजरा केला.समता पॅनलच्या विजयाचे शिल्पकार माजी आ.दत्तात्रय सावंत हेच ठरले.

Advertisement
Pramod Deshmukh of Samata Panel won by a majority of votes

या पतसंस्थेची एकूण मतदार संख्या ३२,००० असून त्यातील २९,००० मतदार पात्र होते. यापैकी १९,००० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
     समता पॅनेलच्या उमेदवारांच्या विजयात दत्तात्रय सावंत यांचे समर्थक सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे क्रिडा सचिव सुरेश गुंड, बाळे पतसंस्थेचे माजी चेअरमन मुकुंद मोहिते, शाळा कृती समिती तालुकाध्यक्ष आण्णासाहेब मोरे, कृती समितीचे राज्यसंघटक समाधान घाडगे, कृती समितीचे कार्याध्यक्ष मारुती गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख  शंकर वडणे, जिल्हा अध्यक्ष  गुरुनाथ वांगीकर, मुख्याध्यापक संघाचे बार्शी तालुका अध्यक्ष राजकुमार पुजारी,मुख्याध्यापीका ज्योत्स्ना डोके,
राज्य संघटक राजेंद्र आसबे,संपत देशमुख यांच्यासह महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आदींचे योगदान महात्वाचे ठरले.
मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांचे चिरंजीव विक्रमसिंह माने व पुणे विभाग मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी श्रवण बिराजदार यांचा दारून पराभव करून समता पॅनलचे श्री. देशमुख यांनी मोठ्या मतांची आघाडी घेऊन घवघवित विजय मिळविला.

चौकट;प्रमोद देशमुख (नुतन संचालक, बार्शी)
सलग बाविस वर्ष माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याचे फळ संचालक निवडीने मला मिळाले असुन पदाला न्याय देऊन कामकाज केले जाईल.

Leave a Reply