October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

MIM व वंचितच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई  महाराष्ट्रातील एमआयएम आणि वंचितच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज खासदार फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा जाहीर प्रवेश राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आज (२० ऑक्टोबर) पार पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार फौजिया खान, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार बाळासाहेब पाटील, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.

कुर्ला विधानसभा क्षेत्रातील एमआयएम पक्षाकडून उमेदवारी लढवलेले प्रा.अविनाश गोपीचंद बर्वे, कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व येथील एमआयएम वरीष्ठ नेते विकी बाळासाहेब जाधव, मातंग समाजाच्या नेत्या आणि बचत गटांच्या माध्यमातून मुंबईत नेटवर्क उभारलेल्या स्मिता मल्हारी साठे, १३ वर्षांपासून ऑल इंडिया रेडिओ मुंबई येथे पत्रकार म्हणून कार्यरत असलेल्या भारती गांधी, ठाणे पूर्व येथील वंचितचे नेते मंगेश लक्ष्मण सूर्यवंशी, विक्रोळी पूर्व येथील वंचितचे नेते फिरोज खान, मानखुर्द येथील मातंग समाजाचे नेते विजय क्षीरसागर, फलटण येथील धनगर समाजाचे नेते बाळासाहेब शंकरराव मदने, मानखुर्द येथील बंजारा समाजाचे नेते सुनील चव्हाण आदींसह महाराष्ट्रातील विविध भागातील कार्यकर्ते व नेत्यांचा समावेश आहे.

Leave a Reply