October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

बार्शी तालुक्यातील कोरेगाव परिसरात वनविभागाकडुणच झाडांची कत्तल

बार्शी : (महाराष्ट्र स्पीड न्युज)
  एकिकडे शासन वृक्ष लागवड व संगोपनावर कोट्यावधी रूपये खर्चुन वनसंपदा वाढवण्यासाठी प्रयत्न करत असताना कोरेगाव ता.बार्शी परिसरात मात्र शासनाच्याच आदेशाने  वन विभाग बार्शी यांच्यामार्फत वनडोंगरातील तब्बल 60 ते 65 वर्षांखालील ग्लेरसीडीया जातींची लाखो झाडे जीसीबी या यंत्राच्या साह्याने तोडण्याचे काम चालू आहे.ऐन उन्हाळ्यात झाडे तोडुन जंगल भकास करूण पशु,पक्षी,वन्य प्राण्यांचा निवारा हिरावून घेतला जात असल्यामुळे वन्य प्रेमीमधुन संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
लाखो हेक्‍टरवरील वनसंपदा शासन व वनविभागाच्या या कृतीमधून नष्ट होणार आहे.नवीन वनसंपदा निर्माण होण्यास अणेक  वर्षाचा कालावधी जाणार आहे.भर उन्हाळ्यात बहरलेले डोंगर अणेक वर्ष भकास राहणार आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की कोरेगाव येथे वन विभाग बार्शीच्या वतीने वन डोंगरामध्ये मोठ-मोठी गीलर सीडी जातीची जुनी झाडे आधुनिक यंत्राच्या साह्याने तोडण्याचे काम चालू आहे.जुने वृक्ष तोडुन त्या ठिकाणी वन विभागाच्या वतीने ईतर प्रकारची व गावरान जातीची लोक उपयोगी असणारी झाडे लावण्याचे काम केले जाणार आहे.
    वनविभागाकडुण सध्या दहा हेक्‍टरवरील झाडे तोडण्याचे कामकाज चालू आहे. कोरेगाव येथील वनसंपदेचा विचार करता कोरेगाव मध्ये हजारो हेक्टर जमीन वन डोंगर रांगा ने व्यापला आहे. त्यामध्ये 90% गीलर सीडी जातीची झाडे आहेत व सर्व जमीन वन विभागाच्या ताब्यामध्ये आहे.गीलर सीडी जाती चे झाड उन्हाळ्यात व कडक उन्हातही हिरवगार असते व ते झाड पाण्याअभावी कधीच जात नाही. त्यामुळे या बाबींचा व दुष्काळाचा विचार करता त्यावेळेस शासनाने पूर्ण डोंगरांमध्ये गिलर सीडी जातीचे झाडे लावण्याचे काम केले होते तसेच मोठमोठी झाडे असल्यामुळे पाऊस पडण्यास मदत होत आहे.
   वनखाते जी लाखो झाडे तोडत आहे त्या तोडलेल्या झाडाचा उपयोग खत बनवण्यासाठी होणार असल्याचे समजते.
वनविभागाकडुण झाडे तोडण्याचे सुरू असलेले काम योग्य आहे अयोग्य आहे याची शासनामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी असे स्थानिकांची मागणी आहे.

प्रतिक्रिया : कोकाटे(तालुका वन अधिकारी);
झाडे तोडण्याचा निर्णय शासनाचा आहे. त्या झाडापासून कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही त्या झाडामुळे झाडाखाली गवत येत नाही तसेच त्याठिकाणी पक्षी कुठल्याही प्रकारे थांबत नाही.

Leave a Reply