June 4, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

रिक्षाची धडक लागून वृद्ध महिला मयत प्रकारांतील आरोपी निर्दोष मुक्त.

बार्शी : टिळक चौक बार्शी येथे २००८ साली भरधाव वेगाने रिक्षा चालवून एका वृद्ध महिलेस धडक दिल्याने तिच्या मृत्यूस कारणीभुत प्रकरणातील तानाजी शिरसट यास प्रथमवर्ग न्यायदांडाधिकारी आर.एस. धडके यांनी निर्दोष मुक्त केल्याची माहिती अँड. बी.एन. चव्हाण यांनी दिली.

२००८ साली हिरेमठ हॉस्पिटल कडून भरधाव वेगाने रिक्षा चालवत येऊन टिळक चौक येथे एका वृद्धेस धडक दिल्याने त्या वृद्ध महिलेचा पाय मोडला होता. पुढे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा निकाल मंगळवार (ता.१६) रोजी देण्यात आला. या प्रकरणी आरोपीचे वकील अँड.बी.एन. चव्हाण यांनी घटनास्थळा जवळ स्पीडब्रेकर होता. त्यामुळे रिक्षा हे वाहन भरधाव वेगात असू शकत नाही, तसेच यातील साक्षीदार हे फिर्यादीचे नातेवाईक आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही असा युक्तिवाद केला. तो युक्तिवाद मान्य करत या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

Leave a Reply