October 1, 2023

महाराष्ट्र स्पीड न्युज

बातमी विश्वासाची

1 एप्रिल पासुन अवैध ठरणार या आठ बॅकाचे चेक बुक,पासबुक..

बँक ग्राहकांसाठी (Bank Customer’s) एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल 2021 पासून देशातील 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि IFSC कोड अवैध होणार आहेत. म्हणजेच 1 एप्रिलपासून तुमचा जुना चेकबुक कोणत्याही कामाचा राहणार नाही. बँकांकडून चेकद्वारे पेमेंट बंद होईल. यामुळे जर तुमचेही बँक खाते या सार्वजनिक बँकांमध्ये आहे, तर वेळीच आपला चेकबुक बदलून घ्या. Cheque Book, Passbook of These Banks to Become Invalid from April 1 Read Details Here

Advertisement

नवी दिल्ली : बँक ग्राहकांसाठी (Bank Customer’s) एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.1 एप्रिल 2021 पासून देशातील 8 बँकांच्या ग्राहकांचे जुने चेकबुक, पासबुक आणि IFSC कोड अवैध होणार आहेत. म्हणजेच 1 एप्रिलपासून तुमचा जुना चेकबुक कोणत्याही कामाचा राहणार नाही. बँकांकडून चेकद्वारे पेमेंट बंद होईल. यामुळे जर तुमचेही बँक खाते या सार्वजनिक बँकांमध्ये आहे, तर वेळीच आपला चेकबुक बदलून घ्या. या आठ बँकांचे नुकतेच दुसऱ्या बँकांमध्ये विलीनीकरण झाले आहे. बँकांच्या विलीनीकरणामुळे खातेधारकांचा अकाउंट नंबर, आयएफएससी व एमआयसीआर कोडमध्ये बदल होणार आहे. यामुळे 1 एप्रिलपासून बँकिंग सिस्टिम जुने चेक स्वीकारणार नाही. यामुळे या सर्व बँकांच्या ग्राहकांनी त्वरित आपल्या बँक शाखेत जाऊन नव्या चेकबुकच्या मागणीसाठी अर्ज देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या बँकांचे झाले विलीनकरण

  • देना बँक आणि विजया बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले होते.
  • ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचे विलीनीकरण पंजाब नॅशनल बँकेत झाले आहे.
  • सिंडिकेट बँकेचे विलीनीकरण कॅनरा बँकेत झाले आहे.
  • आंध्रा बँक व कॉरपोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण झाले आहे.
  • इलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलीनीकरण झाले आहे.

केंद्र सरकारने अनेक बँकांचे विलीनीकरण केले आहे. बँकांच्या वाढत असलेल्या एनपीएच्या बोज्यामुळे केंद्राने बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला. आता विलीनीकरणानंतर या बँकांच्या चेकबुक, पासबुक, आयएफएससी कोड इत्यादीमध्ये बदल निश्चित आहे. तथापि, सिंडिकेट आणि कॅनरा बँकेच्या ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. सिंडिकेट बँकेत सध्या अस्तित्वात असलेले चेक 30 जून 2021 पर्यंत मान्य असतील. त्यानंतर नवे चेकबुक घ्यावे लागेल. ज्या बँकांचे जुने चेकबुक 1 एप्रिलपासून बाद होणार आहेत त्या बँकांमध्ये देना बँक, विजया बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, आंध्रा बँक, कॉरपोरेशन बँक आणि इलाहाबाद बँक यांचा समावेश आहेत. इन बँकांच्या विलीनीकरणानंतर आता 31 मार्चनंतर याचे जुने चेकबुक चालणार नाहीत.

Leave a Reply