ह्यूमन राइट्स मानवाअधिकार संघाच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी निलेश मुद्दे यांची निवड.

पुणे;महाराष्ट्र स्पीड न्युज
Advertisement
ह्यूमन राइट्स, जनहित मानवाधिकार संघ (महाराष्ट्र राज्य, भारत ) बार्शी तालुका अध्यक्ष पदी निलेश मुद्दे यांची निवड करण्यात आली. संघाचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष एस .एच.पाखरे यांच्या आदेशानुसार ह्युमन राइट्स सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश इटकर यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
या संघटनेच्या माध्यमातून गोरगरीब दलित,वंचित या सर्वच घटकांच्या नागरिकांच्या अडी-अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असून आणि संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक, शिक्षण, कला, क्रीडा, नाट्य अनेक क्षेत्रातील प्रश्न सोडविण्याचे काम करणार असल्याचे निलेश मुद्दे यांनी सांगितले.
यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष पदी कैलास पवार,
पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्षपदी अनिल जाधव,पुणे महिला आघाडी शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई कुसाळकर नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ह्यूमन राइट्स सोशल मीडिया पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश इटकर यांनी अभिनंदन केले.